Virat kohli: किंग कोहली सचिनचा 'तो' रेकॉर्ड मोडणार? विराट फक्त एक पाऊल मागे...

T20 World Cup 2022: टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहली, सचिन तेंडुलकरच्या एका मोठ्या विक्रमाच्या जवळ आहेत.

Updated: Oct 22, 2022, 07:28 PM IST
Virat kohli: किंग कोहली सचिनचा 'तो' रेकॉर्ड मोडणार? विराट फक्त एक पाऊल मागे... title=

T20 World Cup 2022: टी-ट्वेंटी वर्ल्ड कपला धमाकेदार अंदाजात सुरुवात झाली आहे. क्वालिफायर आणि सराव सामने खेळले गेले. त्यानंतर आता 22 ऑक्टोबरपासून म्हणजे आजपासून सुपर 12 सामन्यांना सुरूवात झाली आहे. त्यानंतर 23 ऑक्टोबरला भारत आणि पाकिस्तान (India VS Pakistan) यांच्यात शानदार सामना होणार आहे. अशातच आता भारताचा स्टार फलंदाज किंग कोहली (Virat Kohli) एका मोठा विक्रम आपल्या नावावर करण्याच्या तयारीत आहे.

विराटकडे सचिनचा (Sachin Tendulkar) एक विक्रम मोडण्याची संधी आहे. विराट कोहली (Virat Kohli)  सध्या फॉर्ममध्ये असल्याने सचिनचा हा विक्रम विराट मोजणार की नाही?, असा सवाल आता उपस्थित होताना दिसत आहे. विराटच्या या विक्रमावर आता सर्व चाहत्यांचं लक्ष लागलं आहे.

काय आहे Sachin Tendulkar चा रेकॉर्ड -

सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) आणि विराट कोहली (Virat Kohli) या दोघांनी विश्वचषकाच्या स्पर्धांमध्ये प्रत्येकी 23-23 वेळा 50 पेक्षा अधिक धावा करण्याचा टप्पा पार केलाय. जर किंग कोहलीने या विश्वचषकात एकदा जरी अर्धशतक केलं तर हा विक्रम त्याचाकडून मोडला जाईल. सचिनने आयसीसीच्या मर्यादित षटकांच्या सामन्यात 50 पेक्षा अधिक धावा करण्याचा विक्रम स्वत:च्या नावावर केला होता. त्यानंतर आता विराटने दरवाजे ठोठावले आहेत.

जाणून घ्या आकडेवारीचं गणित -

सचिन तेंडुलकर आयसीसीच्या (ICC) मर्यादित षटकांचे 61 सामने खेळला आहे. तो वनडे विश्वचषकाबरोबर केवळ चॅम्पियन्स ट्रॉफी खेळलाय. 61 सामन्यात सचिनने 7 शतके आणि 16 अर्धशतके ठोकली आहेत. तर दुसरीकडे विराटने आयसीसीच्या मर्यादित षटकांचे 60 सामने खेळलेत. त्यात 10 टी -ट्वेंटी वर्ल्डकपमधील अर्धशतक केलीत. तर वनडे वर्ल्ड कपमधील 26 सामन्यांमध्ये 2 शतके व 6 अर्धशतके केली आहेत.