मुंबई: भारत आणि पाकिस्तान हा खेळ क्रिकेटच्या मैदाना पुरता मर्यादीत राहात नाही तर तो देशप्रेमासोबत जोडला जातो. या खेळात लोकांच्या भावना जोडल्या जातात. जेव्हा जेव्हा भारत आणि पाकिस्तानचे संघ क्रिकेट मैदानावर समोरासमोर येतात तेव्हा चाहत्यांचा उत्साह शिगेला पोहोचलेला असतो. कधीकधी या दोन संघांचे खेळाडू एकमेकांशी भिडतात. एकदा भारत पाकिस्तान सामन्या दरम्यान महेंद्रसिंह धोनीला असा घातक बॉल टाकला की त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊ शकली असती. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 धोनीने 2004 मध्ये क्रिकेटमध्ये पदार्पण केले आणि कमी कालावधीतच त्याने आपल्या भक्कम खेळाच्या मोठं नाव कमवलं. 2006 साली जेव्हा टीम इंडिया पाकिस्तान दौर्‍यावर होती. त्यावेळी कनेरियाने गोलंदाजी करत घातक बॉल टाकला. धोनीनंही त्या बॉलला चोख प्रत्युत्तर दिलं आणि स्वत:चा बचाव केला. धोनी त्यावेळी थोडक्यात वाचला. महेंद्रसिंह धोनीनं मात्र डाव उधळला आणि त्याने आपला बचाव केला.



धोनीनं त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी आपल्या बॅटनं धडा शिकवायचं ठरवलं. धोनीने पुढचे सगळे शॉट लांब सिक्स मारून त्याला प्रत्युत्तर दिलं. 153 चेंडूमध्ये 148 धावांची खेळी केली. त्यामध्ये 19 चौकार आणि 4 लांब षटकार ठोकले. धोनीच्या चपळाईमुळे तो वाचला आणि आपल्या खेळातून बॉलरला उत्तर दिलं.


महेंद्रसिंह धोनी आज एक यशस्वी कर्णधार आणि फलंदाज म्हणून जगप्रसिद्ध आहे. मैदानातील प्रत्येक बारकावे त्याला माहिती आहेत. सर्वात यशस्वी कर्णधार म्हणून धोनीकडे पाहिलं जातं. माहीने आपल्या कारकीर्दीत टी 20 वर्ल्ड कप, वन डे वर्ल्ड कप आणि एक चॅम्पियन्स ट्रॉफी भारताला मिळवून दिली आहे.