IND vs PAK : पाकिस्तानचं टीम इंडियाला सरप्राईज, अचानक `या` स्टार ऑलराऊंडरची एन्ट्री; Playing XI जाहीर!
IND vs PAK, Playing XI : आशिया चषकाच्या सुपर 4 फेरीतील भारताविरुद्ध सामन्यासाठी पाकिस्तानने आपली प्लेइंग इलेव्हन जाहीर केलीये. बाबर आझमच्या नेतृत्वाखाली मोठा बदल करण्यात आला आहे.
Pakistan announced playing 11 against team india : कोलंबोतील आर प्रेमदासा स्टेडियमवर मैदानावर भारत आणि पाकिस्तान (IND vs PAK) यांच्यात सामना खेळवला जाणार आहे. उद्या म्हणजेच 10 सप्टेंबर रोजी उभय संघात हा सामना दुपारी 3 वाजल्यापासून सुरू होईल. आशिया कपमधील (Asia Cup) सुपर 4 स्टेजच्या तिसऱ्या सामन्याची रंगत आणखीच वाढल्याचं दिसतंय. दोन्ही संघ उत्सुक असताना आता पाकिस्तानने एक दिवस आधीच पाकिस्तानने टीम जाहीर (Pakistan announced playing 11) केली आहे. यावेळी पाकिस्तानने भारताला एक सरप्राईज दिलंय.
पाकिस्तानने संघ जाहीर करताच टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. पाकिस्तानने संघात सलमान आगा या ऑलराऊंडरला संधी दिली आहे. सलमान आगा हा पाच वर्षापूर्वी टीम इंडियाविरुद्ध खेळला होता. त्यानंतर त्याला संधी मिळाली नाही. आता तो पुन्हा भारताविरुद्ध खेळताना दिसणार आहे. बांग्लादेशविरुद्धची टीम बाबरने कायम ठेवली असून स्पिन ऑलराउंडर मोहम्मद नवाझ याला संधी दिलेली नाही. त्यामुळे आता अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलंय.
पाकिस्तानचा संघ | बाबर आझम (कर्णधार), शादाब खान (उपकर्णधार), फखर जमान, इमाम उल हक, आगा सलमान, इफ्तिखार अहमद, मोहम्मद रिझवान (यष्टीरक्षक), फहीम अश्रफ, नसीम शाह, शाहीन आफ्रिदी, हरिस रौफ.
संभाव्य भारतीय संघ | रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, इशान किशन, केएल राहुल, हार्दिक पांड्या (उपकर्णधार), रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव.
दरम्यान, भारत-पाकिस्तानदरम्यान 2 सप्टेंबरला झालेला सामना पावसामुळे रद्द झाला होता. आता दुसऱ्या सामन्यावरही पावसाचं सावट असल्याचं सांगण्यात आलंय. त्यामुळे 10 सप्टेंबरला सामना झाला नाही तर 11 रिझर्व्ह डे ठेवण्यात आला आहे. त्यामुळे आता सामन्याचा निकाल लागणार हे पक्कं झालंय.
केएल राहुलला संधी देणार का?
राहुल (KL Rahul) पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनचा भाग बनू शकतो. त्यामुळे आता पाकिस्तानला घाम फुटला आहे. खुद्द मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड (Rahul Dravid) यांनी राहुलला मोलाचे सल्ले दिलेत.