'थोडी लाज वाटू द्या, चेष्टा करता काय?', IND vs PAK सामन्यावरून व्यंकटेश प्रसादने झाप झाप झापलं!

India Vs Pakistan Reserve Day : भारत आणि पाकिस्तान (Ind vs Pak) यांच्यातील हायप्रोफाईल मॅचसाठी राखीव दिवस ठेवण्यात आलाय. त्यावरून मोठा राडा झाल्याचं पहायला मिळतंय.

Updated: Sep 9, 2023, 07:19 PM IST
'थोडी लाज वाटू द्या, चेष्टा करता काय?', IND vs PAK सामन्यावरून व्यंकटेश प्रसादने झाप झाप झापलं! title=
Venkatesh Prasad, India Vs Pakistan, Reserve Day

Venkatesh Prasad On Ind vs Pak : आशिया चषकमधील सुपर 4 टप्प्यातील भारत आणि पाकिस्तान (Ind vs Pak) यांच्यातील हायप्रोफाईल मॅचसाठी राखीव दिवस (Reserve Day) ठेवण्यात आला आहे. त्यावरून आता क्रिडाविश्वात वाद पेटल्याचं दिसून आलंय. प्रतिस्पर्धी संघांच्या सर्व चार सदस्य मंडळांशी सल्लामसलत करून घेण्यात आल्याची माहिती श्रीलंकन क्रिकेट बोर्डाने दिलीये. त्यांनी ट्विट करत अधिकृत माहिती दिली होती. त्यानुसार, एसीसीने मान्य बदल लागू करण्यासाठी स्पर्धेच्या खेळण्याच्या स्थितीत प्रभावीपणे सुधारणा केली आहे, असंही ट्विट करून सांगण्यात आलंय. त्यावर आता टीम इंडियाचा माजी खेळाडू व्यंकटेश प्रसाद (Venkatesh Prasad) याने ट्विट करत टीका केली आहे.

काय म्हणतो व्यंकटेश प्रसाद?

रिझर्व डे जर खरं असेल तर हा पूर्ण निर्लज्जपणा आहे. आयोजकांनी चेष्टा केली आहे आणि इतर दोन संघांसाठी नियम वेगळे असल्यानं स्पर्धा घेणं अनैतिक आहे. न्यायाच्या नावाखाली पहिला दिवस सोडला तरच न्याय्य ठरेल, दुसऱ्या दिवशी जोराचा पाऊस पडू दे आणि हे दुष्ट मनसुबे यशस्वी होणार नाहीत, असं व्यंकटेश प्रसाद म्हणतो.

आणखी वाचा - किंग कोहलीचा जबरा फॅन! सोन्याच्या लंकेत विराटला मिळाली 'चांदीची बॅट', पाहा Video

तुमच्या स्वतःच्या सामन्यांसाठी राखीव दिवस मिळत नसताना या अवास्तव मागणीवर सहमती दर्शवण्यासाठी कोणता दबाव होता? आपल्याच संघाला पात्र ठरण्याची संधी मोजावी लागली तरीही भारत विरुद्ध पाकिस्तानचा सामना वाया जाणार नाही याची खात्री करण्यासाठी इतकी उदारता का? कृपया असं करण्यामागचा हेतू आणि कारण स्पष्ट कराल का? असा सवाल व्यंकटेश प्रसादने श्रीलंका क्रिकेट बोर्डाला विचारला आहे. त्यावेळी त्याने बीसीसीआयला देखील टोले लगावले.

आमचा संघ चांगला आहे आणि आम्ही विश्वचषक स्पर्धेसाठी प्रबळ दावेदार आहोत पण आम्हाला स्टेडियममध्ये संघाचा जयजयकार करणार्‍या अस्सल चाहत्यांची गरज आहे आणि त्यांचा अनुभव पूर्वीपेक्षा कितीतरी अधिक नितळ आणि सोपा असावा आणि त्यासाठी बीसीसीआयला खूप काही करण्याची गरज आहे. टीम इंडिया संपूर्ण देशाचं प्रतिबिंब आहे आणि एक राष्ट्र म्हणून आपल्याला कोणत्याही किंमतीवर निराश होऊ देऊ नये, असा सल्ला प्रसाद याने टीम इंडियाला दिलाय.