T20 World Cup : विराट कोहलीला शुभेच्छा देताना शशी थरूर यांच्याकडून झाली मोठी `चुक`
आपल्या अनोख्या इंग्रजी शद्बाने नागरीकांना Dictionary हातात घ्यायला लावणारे शशी थरूर जेव्हा चुकतात...विराटला शुभेच्छा देताना लिहलं की...
पर्थ : ऑस्ट्रेलियात सुरु असलेल्या टी20 वर्ल्ड कप (t20 World Cup) सामन्यात टीम इंडियाने (Team India) रविवारी पाकिस्तानवर 4 विकेट राखून दणदणीत विजय मिळवला. या विजयाचा शिल्पकार विराट कोहली (Virat Kohli) ठरला आहे. विराटच्या या कामगिरीनंतर त्याच्यावर क्रिडा जगतासह राजकिय वर्तुळातून कौतूक करण्यात आले. त्यात काँग्रेस नेते शशी थरूर (shashi tharoor) यांनी देखील ट्विट करून विराट कोहलीचे कौतुक केले होते. मात्र त्यांच्याकडून या ट्विटमध्ये चुक झाल्याची घटना समोर आली आहे. या ट्विटमुळे त्यांना आता ट्रोल केले जातेय.
काय ट्विट केले आहे?
शशी थरूर (shashi tharoor) यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले की, 'भारत पाकिस्तान सामना पाहण्यासाठी मी मुद्दाम गोव्याहून फ्लाइट सोडले. तर पुढील फ्लाइट रात्री 9.55 वाजता आहे हे मला माहीत होते. ते म्हणाले की, रविवारी सकाळी गोव्यातील कॅथोलिक विद्यापीठाच्या एका कार्यक्रमात संबोधित केल्यानंतर मी नियोजित फ्लाइटला नकार दिला. कारण सामना खूप रोमांचक चालला होता, जर मी फ्लाइट पकडली असती तर मी सामना गमावला असता, असे ते म्हणाले.
तर दुसऱ्या ट्विटमध्ये त्यांनी विराटच्या कामगिरीचे कौतूक केले. शशी थरूर (shashi tharoor) ट्विटमध्ये म्हणाले की, 'हा माणूस एक हुशार आणि भरवशाचा खेळाडू दोन्ही आहे! विराट कोहलीची (Virat Kohli) स्तुती करताना थरूर (shashi tharoor) यांनी ट्विटमध्ये authetic हा शब्द चुकीचा लिहिला होता. ही त्यांची चुक नेटकऱ्यांनी पकडली होती. त्यानंतर थरूर यांना नेटकऱ्यांनी ट्रोल करण्यास सुरुवात केली.
दरम्यान शशी थरूर (shashi tharoor) नेहमीच इंग्रजीचे नवनवीन शब्द मीडियाला देणाऱ्या प्रतिक्रियेत आणि ट्विटमध्ये वापरतात. त्यांच्या या शब्दानंतर सर्वच जण डिक्शनरी हातात घेऊन त्या शब्दाचा अर्थ शोधू लागतात. असे अनेकदा झाले आहे. त्यामुळे इंग्रजीच्या नवनवीन शब्दांचा वापर करणारे शशी थरूर चुकले तरी कसे असा प्रश्न नेटकऱ्यांना पडला होता.
शशी थरूर यांचे स्पष्टीकरण
काही युझर्सनी तुम्ही authetic हा शब्द चुकीचा लिहिला असल्याचे म्हणत थरूर यांना चुक दाखवून दिली होती. त्यानंतर शशी थरूर (shashi tharoor) यांनी स्पष्टीकरण देत म्हटले की, टायपिंगमधील चुकीमुळे हे घ़डले असावे, असे स्पष्टीकरण त्यांनी दिले आहे.