IND vs PAK : मोफत कुठे आणि कसा पाहता येणार भारत-पाकिस्तान सामना, पाहा एक क्लिकवर
IND vs PAK Watch LIVE Free Online: श्रीलंकेत रंगणार असल्याने भारतीय चाहत्यांना स्टेडियममध्ये जाऊन हा सामना पाहणं शक्य नाही. अशातच भारतीय लोकं हा सामना मोफत कसा, कुठे आणि किती वाजता पाहू शकणार आहेत, ते पाहूया.
IND vs PAK Live Streaming Free on Mobile: एशिया कप 2023 ला सुरुवात झाली असून उद्या यामध्ये भारत-पाकिस्तान हा हायव्होल्टेज सामना रंगणार आहे. प्रत्येक क्रिकेट चाहत्यांना याची उत्सुकता आहे. हा सामना श्रीलंकेत रंगणार असल्याने भारतीय चाहत्यांना स्टेडियममध्ये जाऊन हा सामना पाहणं शक्य नाही. अशातच भारतीय लोकं हा सामना मोफत कसा, कुठे आणि किती वाजता पाहू शकणार आहेत, ते पाहूया.
शनिवारी भारत-पाकिस्तान सामना दुपारी 3 वाजता रंगणार असून तुम्ही हा सामना घर-बसल्या पाहू शकता. भारत-पाकिस्तान यांच्यात खेळवला जाणारा हा हायव्होल्टेज सामना स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर प्रसारित केला जाणार आहे. इतकंच नाही तर भारतीय चाहते, डीडी स्पोर्ट्स या चॅनलवरून देखील हा सामना एन्जॉय करू शकतात.
मोबाईलवरही पाहू शकता IND vs PAK सामना (IND vs PAK Live Streaming Free on Mobile)
जर तुम्हाला IND vs PAK सामना मोबाईलवर पहायला आहे, तर तुमच्यासाठी एक चांगली बातमी आहे. एशिया कप 2023 हा तुम्ही हॉटस्टार एपवर HD क्वालिटीमध्ये मोफत पाहू शकता. त्यामुळे भारतीय चाहते या 2 ठिकाणी मोफतपणे भारत-पाकिस्तानचा सामना पाहू शकतात.
भारत-पाकिस्तानसामन्यावर पावसाचं सावट? (IND vs PAK Weather)
Accu Weather च्या अहवालानुसार, शनिवारी म्हणजेच 2 सप्टेंबर रोजी श्रीलंकेतील कॅंडी शहरात पाऊस पडण्याची शक्यता आहे. कॅंडी शहरातील पल्लेकेले स्टेडियमवर भारत आणि पाकिस्तान ( India vs Pakistan ) यांच्यात शानदार सामना रंगणार आहे. या ठिकाणी 70 टक्के पाऊस पडण्याची शक्यता आहे. जर या सामन्यात पाऊस पडला तर दोन्ही टीम्सना पॉईंट्स वाटून देण्यात येतील. कारण या सामन्यासाठी रिझर्व डे ठेवण्यात आलेला नाही.
कशी असेल पाकिस्तानविरूद्ध टीम इंडिया
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, केएल राहुल, इशान किशन, हार्दिक पंड्या (उपकर्णधार), रविंद्र जडेजा, शार्दुल ठाकुर, अक्षर पटेल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मो. सिराज, प्रसीद कृष्णा
कशी असेल भारताविरूद्ध टीम इंडिया
अब्दुल्ला शफीक, बाबर आझम (कर्णधार), फखर जमान, इमाम उल हक, तैयब ताहिर, आगा सलमान, फहीम अशरफ, इफ्तिखार अहमद, मोहम्मद नवाज़, सऊप शकील, शादाब खान, मोहम्मद हारिस (विकेटकीपर), मोहम्मद रिझवान (विकेटकीपर), हारिस रऊफ, मोहम्मद वसीम, नसीम शाह, शाहीन अफरीदी, उसामा मीर