मुंबई : आयपीएलनंतर आता सर्व क्रिकेट चाहत्यांच लक्ष हे टीम इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका टी 20 मालिकेकडे (India vs South Africa) लागून राहिलंय. या मालिकेला 9 जूनपासून सुरुवात होतेय. निवड समितीने या सीरिजसाठी युवा खेळाडूंना संधी दिली आहे. टीम इंडियाचा नियमित कर्णधार रोहित शर्माला या मालिकेसाठी विश्रांती देण्यात आली आहे. त्यामुळे केएल राहुलला नेतृत्वाची जबाबदारी दिली आहे. त्यामुळे आता केएलसोबत ओपनिंग कोण करणार, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. (ind vs sa 1st t20i team india ishan kishan or ruturaj gaikwad who will open with captain k l rahul against south africa)


धोनीच्या लाडक्यामुळे रोहितच्या खळाडू 'आऊट'? 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दक्षिण आफ्रिका विरुद्धच्या पहिल्या टी 20 साठी ऋतुराज गायकवाडला संधी मिळू शकते. तर इशान किशनला आणखी वाट पाहावी लागेल. ऋतुराज आयपीएलमध्ये महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वात चेन्नईकडून खेळतो. तर इशान रोहितच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्सकडून खेळतो. 


दोघेही आक्रमक फलंदाजीत माहिर


दक्षिण आफ्रिका विरुद्धच्या पहिल्या टी 20 सामन्यात ऋतुराजमुळे इशानचा पत्ता कट होऊ शकतो. ऋतुराजने आयपीएलच्या 15 व्या मोसमातील 14 सामन्यांमध्य 368 धावा केल्या. तर इशान आपल्या लौकीकाला साजेशी कामगिरी करण्यात अपयशी ठरला. त्यामुळे आता या दोघांपैकी कोण कोणाचा पत्ता कट करणार, हे पहिल्या सामन्यात स्पष्ट होईल. 


टी 20 सीरीजसाठी टीम इंडिया : केएल राहुल (कॅप्टन), ऋतुराज गायकवाड, ईशान किशन, दीपक हुड्डा, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (विकेटकीपर), दिनेश कार्तिक (विकेटकीपर), हार्दिक पांड्या, वेंकटेश अय्यर, युझवेंद चहल, कुलदीप यादव, अक्षर पटेल, रवि बिश्नोई , भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, अवेश खान, अर्शदीप सिंह आणि उमरान मलिक.