मुंबई :  टीम इंडियाला दक्षिण आफ्रिका (IND vs SA) विरुद्धच्या पहिल्या टी 20 सामन्यात 200 पेक्षा अधिक धावा करुनही पराभवाचा सामना करावा लागला. आफ्रिकेने टीम इंडियावर 7 विकेट्सने विजय मिळवला. या विजयासह आफ्रिकेने 5 सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. या सामन्यात टीम इंडियाच्या स्टार खेळाडूने निराशाजनक कामगिरी केली. हा खेळाडू टीम इंडियाच्या पराभवाचं कारण ठरलं. त्यामुळे कॅप्टन रिषभ पंत (Rishbh Pant) दुसऱ्या सामन्यात या खेळाडूला डच्चू देऊ शकतो.  (ind vs sa 2nd t20i team india captain rishbh pant wiil changes in playing eleven Umran Malik replaces Hershal Patel)


हर्षल पटेलकडून निराशा 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हर्षल पटेल पहिल्या सामन्यात अपयशी ठरला. आफ्रिकेच्या फलंदाजांनी त्याच्या गोलंदाजीचा चांगलाच समाचार घेतला. हर्षलने आपल्या 4 ओव्हरच्या स्पेलमध्ये 43 धावा देत अवघी 1 विकेट घेतली. डेथ ओव्हर्समध्ये हर्षलने निराशा केली. त्यामुळे हर्षलला दुसऱ्या सामन्यातून डच्चू मिळू शकतो. तर त्याच्या जागी उमरान मलिकला संधी मिळू शकते.  


उमरान मलिकने आयपीएलच्या 15 व्या मोसमात आपल्या गोलंदाजीची छाप सोडली. त्याच्या या कामगिरीच्या जोरावर आफ्रिका विरुद्धच्या टी 20 मालिकेत निवड करण्यात आली. 


उमरानला पदार्पणाची संधी मिळणार?


हर्षलच्या निराशाजनक कामिगरीमुळे कॅप्टन पंत उमरान मलिकला संधी देऊ शकतो. उमरानने आयपीएलच्या 15 व्या मोसमातील 14 सामन्यात 22 विकेट्स घेतल्या होत्या. त्यामुळे पंत उमरानला संधी देणार का याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.


उभयसंघातील दुसरा सामना हा 12 जूनला कटकमध्ये खेळवण्यात येणार आहे. आफ्रिका मालिकेत आघाडीव आहे. त्यामुळे दुसरा सामना जिंकून बरोबरी साधण्याचा प्रयत्न टीम इंडियाचा असेल.