IND vs SA 3rd Odi | क्विंटन डी कॉकची शतकी खेळी, टीम इंडियाला विजयासाठी 288 धावांचे आव्हान
दक्षिण आफ्रिकेने टीम इंडियाला (ind vs sa 3rd odi) विजयासाठी 288 धावांचे आव्हान दिले आहे.
केपटाऊन : टीम इंडिया (Team India) विरुद्ध दक्षिण आफ्रिका (South Africa) यांच्यात केपटाऊन इथे तिसरा एकदिवसीय सामना (IND vs SA 3rd Odi) खेळवण्यात येत आहे. या सामन्यात आफ्रिकेने टीम इंडियाला विजयासाठी 288 धावांचे आव्हान दिले आहे. आफ्रिकेने 49.5 ओव्हरमध्ये ऑलआऊट 288 धावा केल्या. सलामवीर क्विंटन डी कॉकने (Quinton de Kock) केलेल्या शतकी खेळीच्या जोरावर आफ्रिकेला इथवर मजल मारता आली. (ind vs sa 3rd odi south africa set 288 runs target win for team india at newlands cape town)
क्विंटन डी कॉकने 130 चेंडूत 12 फोर आणि 2 सिक्ससह 130 धावांची खेळी केली. तर रॅसी व्हॅन डर ड्युसेनने 52 धावांची खेळी केली. टीम इंडियाकडून प्रसिद्ध कृष्णाने (Prasidh Krishna) सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. तर जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) आणि दीपक चाहर (Deepak Chahar) जोडीने प्रत्येकी 2 विकेट्स मिळवल्या.
टीम इंडिया प्लेइंग इलेव्हन | केएल राहुल (कॅप्टन), शिखर धवन, विराट कोहली, रिषभ पंत (विकेटकीपर), श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, जयंत यादव, दीपक चहर, प्रसिद्ध कृष्णा, जसप्रीत बुमराह आणि युझवेंद्र चहल.
साऊथ आफ्रिका | जनेमन मलान, क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), टेम्बा बावुमा (कर्णधार), एडन मार्कराम, रॅसी व्हॅन डर ड्युसेन, डेव्हिड मिलर, अँडिले फेहलुकवायो, सिसांडा मगला, केशव महाराज, लुंगी एन्गिडी आणि ड्वेन प्रिटोरियस.