कॅप्टन कोहलीने रबाडाला सिक्सरने दिले `उत्तर`
कॅप्टन कोहलीने बॉल सीमापार केला. मैदानात जमलेले विराटचे चाहते जल्लोष करु लागले.
नवी दिल्ली : विराट कोहली आपल्या आक्रमक फलंदाजीसाठी जगभरात ओळखला जातो. त्यामूळे बॉलर्ससाठी मैदानात 'धोका' म्हणून वावरत असतो.
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या वनडेत टीम इंडिया २-० ने पुढे आहे.
९ विकेट्सने विजय
सेंच्युरियन येथील सामना भारताने ९ विकेटने जिकंला. यामध्ये विराट कोहलीने ५० बॉल्समध्ये नाबाद ४६ रन्स बनविले. शिखर धवनने (नाबाद) ५६ बॉल्समध्ये ५१ रन्स बनविले.
बॉल आदळला
सेंच्युरियन वनडेमध्ये साऊथ आफ्रिकेच्या कागिसो रबाडाचा पाचवा बॉल मारण्याचा प्रयत्न केला. हा प्रयत्न फसल्याने विराटला जोरदार बॉल लागला.
कोहली काही वेळ बॅट टेकवून वाकून उभा राहिला. विराट त्यावेळी ४ रन्सवर खेळत होता.
बॉल सीमापार
थोड्यावेळानंतर कोहलीने पुढचा बॉल टाकण्याचा इशारा केला. युवा पेसर रबाडाने ८ व्या ओव्हरचा पुढचा बॉल टाकला.
यावेळी कॅप्टन कोहलीने हा बॉल सीमापार केला. मैदानात जमलेले विराटचे चाहते जल्लोष करु लागले. सिक्स मारल्यानंतर दुसऱ्या बाजूस असलेल्या शिखर धवनला त्याने काहीतरी सांगतले.