Ind Vs SA : या 2 क्रिकेटपटूंचे नशीब रोहित शर्माच्या हाती!
करियर संपणार की रोहित शर्मामुळे पुन्हा खेळण्याची संधी मिळणार? पाहा कोण आहेत 2 क्रिकेटर्स ज्यांचं नशीब रोहित शर्माच्या हाती
मुंबई : टीम इंडियामध्ये सध्या अनेक बदल होत आहेत. कसोटी सामन्यातून रोहित शर्माने माघार घेतली आहे. तर दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर वन डेचं कर्णधारपद रोहित शर्माला देण्यात आलं आहे. रोहित कर्णधारपद विराजमान होताच पहिला सामना दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळणार आहे.
टीम इंडियाच्या वनडे संघाची कमान स्फोटक फलंदाज रोहित शर्माच्या हाती आहे. संघात नवीन कर्णधार येताच अनेक बदल होण्याचा कयास आहे. अशा परिस्थितीमध्ये काही खेळाडूंचं करियर संपण्याची शक्यता आहे. तर काही खेळाडूंना रोहितच्या राज्यात पुन्हा एकदा टीमसाठी खेळण्याची संधी मिळू शकते. त्यामुळे काही खेळाडूंच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.
गेल्या अनेक वर्षात विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली 2 क्रिकेटपटूंना फारशा संधी मिळाली नाही. अशा स्थितीत रोहित शर्माने त्यांना संघात संधी दिली आणि त्याच्या कारकिर्दीत मोलाची भूमिका बजावली. तर त्यांची धोक्यात असणारी कारकीर्द वाचण्याची शक्यता आहे.
या खेळाडूंचं करियर धोक्यात
टीम इंडियाकडून खेळणारा जादुई स्पिनर कुलदीप यादव आणि धडाकेबाज फलंदाज शिखर धवन या दोन्ही खेळाडूंचं करियर धोक्यात असल्याचं सांगितलं जात आहे. गेले काही महिने त्यांना टीममधून खेळण्याची संधी खूप कमी मिळाली. त्यातही त्यांना संधीचं सोनं करणं कठीण झालं. आता रोहितच्या राज्यात या खेळाडूंना संधी मिळाली तर सोनं करण्याची संधी आहे.
कुलदीप यादव करियर
कुलदीप यादवने 22 टी-20 सामन्यात 41 विकेट घेतल्या आहेत. त्याने 45 आयपीएल सामने देखील खेळले आहेत. ज्यात त्याने 40 विकेट घेतल्या आहेत. कुलदीपची वन डे कारकीर्दही चमकदार राहिली आहे. तो 65 वनडेत 107 विकेट घेतल्या आहेत. हे आकडे कुलदीप यादवच्या प्रतिभेचे आकलन करण्यासाठी पुरेसे आहेत. टी-20 फॉरमॅटमध्ये त्याचा इकॉनॉमी रेटही 8 पेक्षा कमी आहे.