घातक बॉलरने तोडली दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूची बॅट, वाचा नेमकं काय प्रकरण
बॅट तोडणं घातक बॉलरला पडलं महागात, टीम इंडियाचं मोठं नुकसान; वाचा नेमकं काय प्रकरण
मुंबई : दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिला टी 20 सामना 7 विकेट्सने टीम इंडियाने गमवला. मात्र या सामन्यातील एक किस्सा चांगलाच चर्चेत आला. टीम इंडियाच्या घातक बॉलरने असा यॉर्कर टाकला की बॅटच तुडली आणि दोन तुकडे होता होता राहिले. या घटनेमुळे सोशल मीडियावर चर्चांना उधाण आलं.
दिल्लीमध्ये 5 टी 20 सामन्यांपैकी पहिला सामना खेळवण्यात आला. या सामन्यात आवेश खानने असा घातक यॉर्कर टाकला की दक्षिण आफ्रिकेचा खेळाडू हा यॉर्कर कधी विसरणार नाही. यॉर्कर बॉलने फलंदाजाची बॅट मधून तुटली. त्याला भलीमोठी चीर पडल्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
आवेशने आफ्रिकेचा फलंदाज व्हॅन डर डुसैंची बॅट तोडली. आवेशच्या पहिल्या ओव्हरमधील 3 बॉलवर एकही धाव काढता आली नाही. मात्र पुढच्या यॉर्करला मारताना व्हॅनच्या बॅटला भलीमोठी चीर पडली आणि तुटली. त्याच्या बॅटची अवस्था पाहण्यासारखी होती.
व्हॅनने बॅट बदलली त्यावेळी त्याचा स्कोअर 26 बॉलमध्ये 22 धावा होता. मात्र जशी बॅट बदलली तसा फलंदाजीचा वेगही बदलला. पुढच्या बॉलवर त्याने तीन षटकार आणि 1 चौकार ठोकला. त्याने 11 बॉलमध्ये 30 धावा केल्या. टीम इंडियाला 7 विकेट्सने पराभवाचा सामना करावा लागला.