पोर्ट एलिजाबेथ : दक्षिण आफ्रिकेच्या विरूद्ध खेळल्या गेलेल्या चौथ्या वन डे सामन्यात भारताने 5 विकेट गमावले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यावेळी भारताने फिल्डिंगमध्ये अपेक्षे सारखा खेळ दाखवला नाही. टीमचे क्षेत्ररक्षण कोच आर श्रीधर यांना आशा आहे की, त्यांचे खेळाडू सतर्क राहतील. कारण येथे वातावरणात हवा असल्यामुळे कॅच पकडणं कठिण झालं आहे. पोर्ट एलिजाबेथमध्ये भरपूर हवा असते कारण येथे नेल्सन मंडेला खाडीच्या जवळ आहे. मंगळवारी हवा महत्वपूर्ण भूमिका साकारणार आहे. 



श्रीधर यांनी पाचव्या मॅचच्या अगोदरच्या पत्रकार परिषदेत सांगितले की, आम्ही या मुद्याला लक्षात ठेवलं आहे. महत्वाचं म्हणजे उंच कॅचकडे आमचं विशेष लक्ष असेल. तसेच बाऊंड्र लाईनवर खेळाडू उभा राहिला तर त्याला चेंडूसोबतच हवेकडे पण पूर्ण लक्ष द्याव लागेल. 



जोहानिसबर्ग वनडे भारत संघ अशापद्धतीने हरला वांडरर्स स्टेडिअमध्ये पावसामुळे मॅचमध्ये दक्षिण आप्रिच्या डकवर्थ लुइस नियमानुसार 28 ओव्हरमध्ये 202 धावा 5 विरेट गमावून भारताने ही मॅच हरली.