India Playing XI 3rd T20: भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका तिसरा टी 20 सामना मंगळवारी खेळला जाणार आहे. तीन सामन्याची मालिका भारताने 2-0 ने आपल्या खिशात घातली आहे. या सामन्यात विराट कोहली खेळणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे. भारताला T20 मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये खेळायचा आहे. मात्र विराट सोमवारी मुंबई विमानतळावर दिसला.  त्याचबरोबर तिसऱ्या सामन्यात केएल राहुलला आराम देण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्लेईंग इलेव्हनमध्ये विराट कोहली ऐवजी श्रेयस अय्यरला स्थान मिळण्याची शक्यता आहे. ऋषभ पंतला सलामीला संधी मिळण्याची शक्यता आहे. तर मधल्या फळीची जबाबदारी अक्षर पटेलच्या खांद्यावर असू शकते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दुसरीकडे, भारतीय गोलंदाजी कमकुवत असल्याचं दिसून आलं आहे. जसप्रीत बुमराह दुखापतग्रस्त झाल्याने त्याची उणीव जाणवत आहे.अर्शदीप सिंह आणि हर्षल पटेल ही उणीव भरून काढण्यात अपयशी ठरले आहेत. तर मोहम्मद सिराज आयपीएल 2022 पासून एकही टी 20 सामना खेळलेला नाही. पण असं असलं तरी 11 खेळाडूंमध्ये मोहम्मद सिराज स्थान मिळण्याची शक्यता आहे. दीपक चाहरही साजेशी कामगिरी करु शकलेला नाही.


IND Vs SA: युजवेंद्र चहलनं आफ्रिकन खेळाडूला मारली लाथ! Video पाहून तुम्हीही पोट धरून हसाल 


India Playing XI 3rd T20: रोहित शर्मा (कर्णधार), ऋषभ पंत, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, दिनेश कार्तिक, अक्षर पटेल, आर. अश्विन, हर्षल पटेल, दीपक चाहर, अर्शदीप सिंह, मोहम्मद सिराज/युजवेंद्र चहल