IND Vs SA: युजवेंद्र चहलनं आफ्रिकन खेळाडूला मारली लाथ! Video पाहून तुम्हीही पोट धरून हसाल

दुसऱ्या टी 20 सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकन संघाला 16 धावांनी मात दिली. या सामन्यात साप, सूर्यकुमार रनआऊट, रोहित शर्माच्या नाकातून रक्त, विराटनं अर्धशतक ऐवजी दिनेश कार्तिकला फटकेबाजी करण्यास सांगणे, असे वेगवेगळे प्रसंग अनुभवता आले.

Updated: Oct 3, 2022, 06:21 PM IST
IND Vs SA: युजवेंद्र चहलनं आफ्रिकन खेळाडूला मारली लाथ! Video पाहून तुम्हीही पोट धरून हसाल title=
Photo- Twitter Viral Video

India Vs South Africa Match Funny Video: तीन सामन्यांची टी 20 मालिका भारताने 2-0 ने आपल्या खिशात घातली आहे. दुसऱ्या टी 20 सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकन संघाला 16 धावांनी मात दिली. या सामन्यात साप, सूर्यकुमार रनआऊट, रोहित शर्माच्या नाकातून रक्त, विराटनं अर्धशतक ऐवजी दिनेश कार्तिकला फटकेबाजी करण्यास सांगणे, असे वेगवेगळे प्रसंग अनुभवता आले. असाच एक अनुभव मैदानात घडला असून तुम्हीही पोट धरून हसाल. हा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. हे प्रसंग लेग स्पिनर युजवेंद्र चहल आणि आफ्रिकन स्पिनर तबरेज शम्सी यांच्या घडला. सामन्यादरम्यान चहलने शम्सीला लाथ मारली. हा प्रसंग कॅमेऱ्यात चित्रित झाला आहे. 

भारत आफ्रिका सामना दोन वेळा थांबवण्यात आला. एकदा साप मैदानात आला आणि दुसऱ्यांदा ग्राऊंडमध्ये प्रकाश देणारा एक टॉवर बंद झाल्याने सामना थांबण्यात आला. या दरम्यान चहल आणि शम्सी खेळाडूंना ड्रिंक्स घेऊन मैदानात आले होते. शम्सी मैदानात उपस्थित असलेल्या क्विंट डिकॉक आणि डेविड मिलर यांच्यासह विकेटकिपर ऋषभ पंतशी बोलत होता. यावेळी मागून शम्सी आला आणि लाथ मारली. ही कृती पाहून इतर खेळाडूंना हसू आवरता आलं नाही. 

दक्षिण आफ्रिकन संघाने नाणेफेक जिंकत भारताला फलंदाजीचं आव्हान दिलं. पहिल्यांदा फलंदाजी करताना भारतीय संघाने 3 गडी गमवून 237 धावा केल्या. सूर्यकुमार यादवने 61, केएल राहुलने 57 आणि विराट कोहलीने 49 धावा केल्या. भारताने दिलेलं लक्ष्य गाठताना दक्षिण आफ्रिकन संघाने 3 गडी गमवून 221 धावा केल्या आणि 16 धावांनी सामना गमवला.