IND vs SA T20I Series | वर्ल्ड कप विजेत्या स्टार खेळाडूचं 3 वर्षांनी टीम इंडियात कमबॅक
टीम इंडियाचा स्टार फलंदाज दिनेश कार्तिकचं (Dinesh Karthik) तब्बल पुनरागमन 3 वर्षानंतर पुनरागमन झालंय.
मुंबई : आयपीएलच्या 15 व्या मोसमानंतर (IPL 2022) टीम इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात टी 20 मालिका (IND vs SA T20I Series) खेळवण्यात येणार आहे. दक्षिण आफ्रिका या सीरिजसाठी भारत दौऱ्यावर येणार आहे. या टी 20 सीरिजसाठी आणि इंग्लंड विरुद्धच्या उर्वरित एका कसोटी सामन्यासाठी बीसीसीआयने भारतीय संघ जाहीर केला आहे.
या सीरिजच्या माध्यमातून टीम इंडियाचा स्टार फलंदाज दिनेश कार्तिकचं (Dinesh Karthik) तब्बल पुनरागमन 3 वर्षानंतर पुनरागमन झालंय. (ind vs sa t20 series bcci announced team india squad dinesh karthik comeback after 3 years)
कार्तिकचं तब्बल 3 वर्षांनी संघात कमबॅक
कार्तिकला या धमाकेदार कामिगिरीनंतर टीम इंडियात संधी द्यावी, अशी क्रिकेट चाहत्यांकडून जोरदार मागणी करण्यात आली होती. अखेर बीसीसीआयने कार्तिकला संधी दिली आहे. टीम इंडियाने 2007 मध्ये टी 20 वर्ल्ड कप जिंकला होता. कार्तिक या वर्ल्ड कप विजयी संघाचा सदस्य होता.
कार्तिकचं तब्बल 3 वर्षांनी संघात कमबॅक झालंय. कार्तिक टीम इंडियाकडून अखेरची टी 20 मॅच ऑस्ट्रेलिया विरुद्ध 27 फेब्रुवारी 2019 ला खेळला होता.
आयपीएलमध्ये दमदार कामगिरी
दिनेश कार्तिकने आतापर्यंत आयपीएलच्या 15 व्या मोसमातील साखळी फेरीत धमाका केला. कार्तिकने 14 सामन्यात 57.40 एव्हरेज आणि 191.33 स्ट्राईक रेटने 287 धावा केल्या. यामध्ये एक अर्धशतक ठोकलं.
केएलकडे कॅप्टन तर नव्या चेहऱ्यांना संधी
दरम्यान या मालिकेसाठी प्रमुख खेळाडूंना विश्रांती तर युवा खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. त्यामुळे उमरान मलिक, अर्शदीप सिंह आणि उमरान मलिक या आयपीएलचा 15 वा मोसम गाजववेल्या खेळाडूंना संधी मिळाली आहे. तसेच केएल राहुलकडे या मालिकेत नेतृत्वाची जबाबदारी असणार आहे.
टी 20 मालिकेचं वेळापत्रक
मॅच तारीख ठिकाण
पहिला सामना 9 जून दिल्ली
दुसरा सामना 12 जून कटक
तिसरी मॅच 14 जून वायझॅग
चौथा सामना 17 जून राजकोट
पाचवी मॅच 19 जून बंगळुरु
टी20 सीरीजसाठी दक्षिण आफ्रिका टीम
टेम्बा बावुमा (कॅप्टन), क्वींटन डी कॉक, रीजा हेंड्रिक्स, हेनरिक क्लासेन, केशव महाराज, एडेन मार्कराम, डेविड मिलर, लुंगी एन्गिडी, एनरिक नोर्टजे, वेन पार्नेल, ड्वेन प्रिटोरियस, कगिसो रबाडा, तबरेज शम्सी, ट्रिस्टन स्टब्स, रस्सी वॅन डेर डूसन आणि मार्को जेन्सन.
टीम इंडिया : केएल राहुल (कॅप्टन), ऋतुराज गायकवाड, इशान किशन, दीपक हुडा, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (विकेटकीपर), दिनेश कार्तिक (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, व्यंकटेश अय्यर, वाय चहल, कुलदीप यादव, अक्षर पटेल, आर बिश्नोई, भुवनेश्वर, हर्षल पटेल, आवेश खान, अर्शदीप सिंग आणि उमरान मलिक.