मुंबई : दिल्ली पाठोपाठ कटकमधील टी-20 सामन्यात टीम इंडियाचा पराभव झालाय. रविवारी दक्षिण आफ्रिकेने हा सामना 4 विकेटने जिंकला. यामुळे टीम इंडिया मालिकेत 0-2 ने पिछाडीवर गेली आहे. या सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंनी निराशा केली असली तरी भारतीय चाहत्यांनी मात्र मन जिंकली होती.या संदर्भातला व्हिडिओ आता समोर आला आहे.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दुसऱ्या टी20 सामन्यात टीम इंडिया पराभवाच्या छायेत असताना देखील चाहत्यांनी खेळाडूंना खुप प्रोत्साहीत केले. अगदी सामन्याच्या सुरुवातीपासूनच भारतीय चाहत्यांचा उत्साह दिसून आला. सामना सुरू होण्यापूर्वी स्टेडियम चाहत्यांनी खचाखच भरले होते.भारत चांगली कामगिरी करण्यास अपयशी ठरला असला तरी चाहत्यांचा उत्साह कायम होता. चाहत्यांनी मोबाईलचे दिवे लावून ए.आर. रहमानचे 'माँ तुझे सलाम' हे गाणे गायले. या गाण्याने संपूर्ण स्टेडियम दुमदुमले होते. या संदर्भातला व्हिडिओ आता व्हायरल होत आहे. 


दरम्यान कटकमधील चाहत्यांचा उत्साह पाहण्यासारखा होता. सामन्याच्या एक दिवस आधी टीम इंडियाचे सराव पाहण्यासाठी चाहतेही स्टेडियमवर पोहोचले होते. 



दुसऱ्या टी20 सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करत 148 धावा ठोकल्या होत्या. या धावांचा पाठलाग करणाऱ्या दक्षिण आफ्रिकेने 10 चेंडूसह  4 विकेट राखत मोठा विजय नोंदवला. हेनरिक क्लासेनने 46 चेंडूत 81 धावांची खेळी करत टीम इंडियाकडून सामना हिसकावून घेतला. 


बॉलर्सची निराशाजनक कामगिरी 
भुवनेश्वर वगळता इतर बॉलर्सची कामगिरी निराशाजनक होती. भुवनेश्वर कुमारने 4 षटकात 13 धावा देत 4 बळी घेतले. आवेश खानने 3 षटकात 17 धावा दिल्या, तर हार्दिक पंड्याने 3 षटकात 31 धावा दिल्या. युझवेंद्र चहलने 4 षटकात 49 धावा दिल्या. अक्षर पटेलने एका षटकात १९ धावा दिल्या. 


दरम्यान 5 टी20 मालिकते भारत 0-2 ने पिछाडीवर आहे. आता तीन सामन्यात भारत पुनरागमन करते का हे पहावे लागणार आहे.