तिरुवनंतपुरम : टीम इंडिया (Team India) सध्या दक्षिण आफ्रिका (South Africa) विरूद्ध टी20 मालिका खेळतेय.या मालिकेत टीम इंडियाने 1-0 ने आघाडी घेतली आहे. या सामन्याच्या दुसऱ्या टी 20 सामन्याची उत्सुकता चाहत्यांना लागली आहे. या सामन्याची उत्सुकता असताना एका स्टार खेळाडूची लव्ह स्टोरी समोर आली आहे. ही लव्ह स्टोरी एकूण अनेकजण आश्चर्य व्यक्त करत आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

स्टार खेळाडूची लव्ह स्टोरी खुपच खास आहे. मायदेश सोडून तो भारतात क्रिकेट खेळायला आला, क्रिकेट खेळता खेळता तो चियरगर्लच्या प्रेमात पडला होता. त्यानंतर दोघांनी लग्नगाठ बांधली. हा खेळाडू दुसरा कोणी नसून दक्षिण आफ्रिकेचा (South Africa) स्टार क्रिकेटर क्विंटन डी कॉक (Quinton de Kock) आहे.  


लव्हस्टोरी


क्विंटन डी कॉकची (Quinton de Kock)  लव्ह स्टोरी बॉलीवूड चित्रपटाच्या कथेपेक्षा कमी नाही आहे. आयपीएलमधील सामन्यादरम्यान क्विंटन डी कॉक आणि साशा हार्ले यांची भेट झाली होती. सामना संपल्यानंतर साशाने फेसबुकवर डी कॉकचे अभिनंदन केले, त्यानंतर दोघांमध्ये चर्चा सुरू झाली. त्यानंतर दोघांची चांगली मैत्री झाली, या मैत्रीचे रूपांतर नंतर लग्नात झाले.


साशा हार्ले (Sasha Hurly) ही एक चीयरलीडर होती. ज्या आयपीएल सामन्यात ती संघाला चीयर करत होती. त्या सामन्यातच क्विंटन डी कॉक खेळत होता. या सामन्यापासूनच त्यांच्या लव्हस्टोरीला सुरुवात झाली होती. त्यानंतर क्विंटन डी कॉक (Quinton de Kock) आणि साशा हर्ले यांनी 2015 मध्ये एंगेजमेंट केली. त्यानंतर 2016 साली त्यांनी लग्न केले.  



नात्याला 5 वर्ष पुर्ण 
साशा हार्ले (Sasha Hurly) सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. ती तिचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते, ज्यांना खूप पसंत केले जाते. साशा हार्ले मैदानावर अनेकदा क्विंटन डी कॉकला चीअर करताना दिसली आहे. गेल्या ५ वर्षांपासून हे दाम्पत्य आनंदाने जगत आहे. 


कारकीर्द 
डी कॉक (Quinton de Kock) हा एक उत्कृष्ट फलंदाज आहे. तो त्याच्या धोकादायक फलंदाजीसाठी प्रसिद्ध आहे. त्याने दक्षिण आफ्रिकेच्या संघासाठी अनेक सामने स्वबळावर जिंकले आहेत. तो आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळतो.त्याने दक्षिण आफ्रिकेच्या संघासाठी 54 कसोटी सामने, 132 एकदिवसीय सामने आणि 70 टी-20 सामने खेळले आहेत.



दरम्यान भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात (IND vs SA 2nd T20) तीन टी20 सामन्यांची मालिका खेळवली जात आहे. टीम इंडियाने पहिला T20 सामना धमाकेदार शैलीत जिंकला आहे. आता दुसरा सामना जिंकून भारत मालिका खिशात घालतो का, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.