IND vs SA : या 5 खेळाडूंनी भारताला मिळवून दिला विजय
या 5 खेळाडूंनी भारताला मिळवून दिला विजय
IND vs SA : या 5 खेळाडूंनी भारताला मिळवून दिला विजय
मुंबई : टीम इंडियाला अखेरीस विजय मिळालाच.
यासाठी भारतीय संघ गेल्या 26 वर्षांपासून वाट पाहत आहे. टेस्ट सीरीजमध्ये पहिल्या दोन टेस्ट अगदी वाईट पद्धतीने हरल्यानंतर टीम इंडियाचं टेस्ट सीरिज जिंकण्याच स्वप्न भंग झालं होतं. मात्र जोहानिसगबर्गच्या तिसऱ्या टेस्ट मॅचमध्ये टीम इंडियाला विजय मिळाला आणि सगळं चित्रच पालटलं.
टीमने सहा मॅचच्या सिरीजमध्ये 5 व्या सामन्यात सर्व अपयश आणि इतिहास विसरून आफ्रिकेला पहिल्यांदाच आपल्याच मातीत धूर चारली. टीमला या विजयासाठी तब्बल 26 वर्ष वाट पाहावी लागली.
टीम इंडियाच्या 5 खेळांडूंच महत्वाचं योगदान
विराट कोहली, शिखर धवन, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव आणि रोहित शर्मा यांच योगदान मोलाचं ठरणार आहे. एका सामन्यात रहाणेच्या बॅटने कमाल केली.
1) विराट कोहली : या सिरीजमध्ये विराट कोहली सर्वात मोठा हिरो ठरला. टेस्ट मॅचनंतर वन डे सिरीजमध्ये देखील कोहलीने सर्वाधिक धावा केल्या आहेत. आतापर्यंत त्याने 2 शतक, दोन अर्धशतक आणि एकूण 429 धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेच्या द्विपक्षीय वन डे सिरीजमध्ये कोहलीने 350 हून अधिक धावा केल्या असून एबी डिविलियर्सनंतर हा दुसरा फलंदाज ठरला आहे.
2) शिखर धवन : 5 मॅचमध्ये शिखर धवनने आतापर्यंत 305 धावा केल्या आहेत. 2 अर्धशतक, 1 शतक केले आहेत. चौथ्या मॅचमध्ये त्याने 100 वे शतक करून भारतीय खेळाडू असल्याचं सिध्द केलं आहे. या अगोदर कुणीही असे रन केलेले नाहीत.
3) युजवेंद्र चहल : याने 5 मॅचच्या 5 इनिंगमध्ये 14 विकेट घेतल्या आहेत. अफ्रिकेच्या या फास्ट पिचवर स्पिनरने या प्रकारे विकेट घेणं कौतुकास्पद आहे. एकदा चहलने तब्बल 5 विकेट घेतल्या आहेत.
4) कुलदीप यादव : चहल आणि कुलदीप यादव यांनी आफ्रिकेत सर्वाधिक विकेट घेतल्या आहेत. कुलदीपने 16 विकेट घेतल्या आहेत. पाचव्या मॅचमध्ये कुलदीपने 4 विकेट घेतल्या. एका ओव्हरमध्ये त्याने 3 विकेट घेऊन आफ्रिकेची कंबर मोडली. या दोघांनी उत्तम कामगिरी केली.
5) रोहित शर्मा : रोहित शर्मा सिरीजच्या चार सामन्यात असफल ठरला आहे. मात्र पाचव्या सामन्यात मात्र त्याच्याच शतकामुळे टीम इंडियाला विजय मिळाला. त्याने सामान्य 115 धावा केल्या. 5 मॅचमध्ये रोहितने 155 धावा केल्या आहेत.