मुंबई : आयपीएलमध्ये केलेल्या उत्तम कामगिरीचं फळ उमरानला मिळालं आहे. अखेर टीम इंडियातून खेळण्याची संधी उमरानला मिळाली. दक्षिण आफ्रिका विरुद्ध टीम इंडिया सीरिजसाठी संघाची घोषणा करण्यात आली. या सीरिजसाठी उमरान मलिक टीम इंडियातून खेळणार आहे. उमरानची आयपीएलमध्ये सर्वोत्तम कामगिरी पाहता त्याला टीम इंडियात संधी मिळाली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उमरानची टीम इंडियात निवड झाल्याने त्याचे वडील खूप खुश आहेत. त्यांनी पहिली प्रतिक्रिया दिली नाही. मी माझा आनंद शब्दात व्यक्त करू शकत नाही. उमरानचे वडील अब्दुल राशिद फळ विक्रेता आहेत. गेल्या दोन महिन्यापासून आपल्या मुलाची टीम इंडियात कधी निवड होणार याची वाट पाहात होते. 


आयपीएलमध्ये जम्मू-काश्मीरच्या 21 वर्षीय उमरानने आयपीएलमध्ये चांगलाच धुमाकूळ घातला आहे. 150 किमीपेक्षा जास्त वेगाने बॉलिंग करत त्याने अनोखा रेकॉर्ड आपल्या नावे केला. एवढंच नाही तर त्याने जसप्रीत बुमराहचा आयपीएलमधील 5 वर्षांपूर्वीचा रेकॉर्डही मोडला आहे. 


उमरान म्हणाला की मला संध्याकपासून खूप जास्त फोन येत आहेत. लोकांनी आणि क्रिकेटप्रेमींनी खूप शुभेच्छांचा वर्षाव केला. मी आता घरी जात आहे. या आनंदात मलाही सहभागी व्हायचं आहे. 


कष्टाशिवाय फळ नाही याची जाणीव होती. त्यामुळे अपार मेहनत केल्यानंतर यश मिळणार हे माहिती होतं. पण किती कालावधी जाईल याची काही माहिती नव्हती. जम्मू-काश्मीरच्या राज्यपालांनी देखील उमरानच्या कामगिरीचं आणि टीम इंडियात सिलेक्ट झाल्यानंतर कौतुक केलं.