कटक : भारत आणि श्रीलंका यांच्यात टी-२० सीरिज बुधवारपासून सुरू होणार आहे. टेस्ट सीरिजनंतर विराट कोहलीच्या अनुपस्थितीत टीम इंडियाने वनडे सीरिज २-१ ने जिंकली. आता रोहित शर्माच्या नेतृत्वातील टीम टी-२० सामन्यातही आपला जलवा दाखवण्यास सज्ज आहे. 


टीम इंडियाचं दमदार प्रदर्शन 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

धर्मशालामधील पहिल्या वनडे व्यतिरीक्त श्रीलंकन टीम या दौ-यावर आपली प्रभावी छाप सोडू शकली नाही. टीम इंडियाने मोहालीच्या सामन्यात सीरिजमध्ये वापसी केली आणि विशाखापट्टणममध्ये श्रीलंकाई टीमने सीरिज जिंकण्याची संधी गमावली. एकावेळी एक विकेटच्या नुकसानावर १३६ रन्सवर खेळणारी श्रीलंकन टीम २१५ रन्सवर ऑल आऊट झाली. महेंद्र सिंह धोनीकडून करण्यात आलेल्या शानदार स्टम्पिंगनंतर स्पिनर कुलदीप यादव आणि युजवेंद्र चहल श्रीलंकेला महागात पडले. 


टीम इंडियाचा रेकॉर्ड चांगला


टी-२० क्रिकेट भलेही वेगळा खेळ आहे आणि टीम इंडिया या मैदानावर खेळलेल्या एकमात्र टी-२० सामन्याच्या चांगल्या आठवणी नाहीयेत. बाराबती स्टेडियमवर श्रीलंके विरूद्ध टीम इंडियाचा रेकॉर्ड ७-४ असा आहे आणि याआधीचे ४ सामने टीम इंडियाने जिंकले आहेत. इथे २०१५ मध्ये खेळल्या गेलेल्या एकमात्र टी-२० सामन्यात टीम इंडिया दक्षिण आफ्रिके विरूध्द ९२ रन्सवर आऊट झाली होती. 


रोहितवर असेल बॅटींगची मदार


टीम इंडियाच्या बॅटींगची जबाबदारी कर्णधार रोहित शर्मावर असेल. त्यासोबतच लोकेश राहुल वरच्या क्रमांकावर असेल. पहिला सामना हरल्यानंतर रोहितच्या दुहेरी शतकाच्या मदतीने टीम इंडियाने मोहालीमध्ये १४१ रन्सने विजय मिळवला होता. रोहित हाच फॉर्म टी-२० मध्येही कायम ठेवण्याची आशा आहे. 


हे खेळाडू खेळतील पहिल्यांदा


गेल्या वर्षी झिम्बॉब्वे विरूद्ध झालेल्या टी-२० सामन्यात खेळणारा जयदेव उनादकट याला पुन्हा संधी देण्यात आली आहे. तर बासिक थम्पी, वाशिंगट्न सुंदर आणि दीपक हुड्डा पहिल्यांदा खेळतील. बडोद्याच्या हुड्डाने फेब्रुवारीमध्ये सैयद मुशातक अली ट्रॉफीमध्ये टी-२० क्रिकेटमध्ये चौथं सर्वात वेगवान शतक लगावलं होतं. टीम इंडियाकडे धोनी आणि हार्दिक पांड्याच्या रूपात दोन फिनिशर आहेत. त्यामुळे हे बघावं लागेल की, हुड्डाला संधी मिळेल की नाही. 


थरंगा पडू शकतो महागात


वेगवान गोलंदाजीची जबाबदारी जसप्रीत बुमराह याच्यावर असेल कारण भुवनेश्वर कुमारला विश्रांती देण्यात आलीये. केरळचा वेगवान गोलंदाज थम्पीही टीममध्ये आहे. स्पिनरमध्ये चहल आणि यादव याच्यावर जबाबदारी असेल. दुसरीकडे लगातार पाच टी-२० सामने हरलेल्या श्रीलंकन टीमचा उपुल थरंगा चांगलाच फॉर्ममध्ये आहे. फलंदाजीची जबाबदारी थरंगा आणि एंजिलो मॅथ्यूजवर असेल. तर मध्य क्रमात निरोशन डिकवेलाकडून चांगल्या प्रदर्शनाची जबाबदारी असेल. श्रीलंकन गोलंदाजांनी धर्मशाला वनडेमध्ये टीम इंडियला ११२ रन्सवर आऊट केले होते. 


टीम्स :


टीम इंडिया - रोहित शर्मा ( कर्णधार ), केएल राहुल, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, दिनेश कार्तिक, एम एस धोनी, हार्दिक पंड्या, वाशिंगटन सुंदर, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, दीपक हुड्डा, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, बासिल थम्पी, जयदेव उनादकट.


श्रीलंकन टीम - थिसारा परेरा (कर्णधार), उपुल थरंगा, एंजेलो मैथ्यूज, कुशाल परेरा, धनुष्का गुणतिलका, निरोशन डिकवेला, असेला गुणरत्ने, सदीरा समरविक्रमा, दासुन शनाका, चतुरंगा डिसिल्वा, सचित पतिराना, धनंजय डिसिल्वा, नुवान प्रदीप, विश्वा फर्नांडो, दुष्मंता चामीरा.