मोहाली : टीम इंडिया विरुद्ध श्रीलंका (IND vs SL 1St Test) यांच्यात 2 कसोटी मालिकेतील पहिला सामना मोहालीत खेळवण्यात येत आहे. या सामन्यात टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहलीसाठी (Virat Kohli) हा विशेष असा सामना आहे. विराटने या सामन्यात शानदार कामगिरी केली आहे. विराटच्या ज्या शतकाचं क्रिकेट चाहते आवर्जून वाट पाहत होते ते 'महाशतक' (Virat Kohli 100th Test) विराटने अखेर पूर्ण केलं आहे. (ind vs sl 1st test day 1 team india virat kohli become 12th indian who played 100 test match completed 8 thaousand runs)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विराटने मैदानात उतरताच हे कसोटी सामन्यांचं शतक पूर्ण केलं. श्रीलंका विरुद्धचा हा पहिला सामना विराटच्या कसोटी कारकिर्दीतील 100 वा सामना ठरला. विराट टीम इंडियाकडून 100 कसोटी सामने खेळणारा 12 वा खेळाडू ठरला. विराटने कसोटी कारकिर्दीत मोठा टप्पा गाठला.



विराटच्या या कामगिरीसाठी आणि योगदानासाठी सामन्याआधी विशेष सन्मान करण्यात आला. तसेच विराटला, सुनील गावसकर, सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली, राहुल द्रविड या आणि यासारख्या दिग्गजांनीही विराटला 100 व्या सामन्यानिमित्त शुभेच्छा दिल्या.


विराटच्या 8 हजार धावा पूर्ण


विराटकडून या सामन्यात शतकी खेळीची अपेक्षा होती. विराटने अखेरचं शतक हे 2 वर्षांआधी झळकावलं होतं. त्यामुळे विराटने या सामन्यात शतक लगावून हा 100 वा सामना आणखी यादगार करावा, अशी क्रिकेट चाहत्यांची इच्छा होती. मात्र विराटने क्रिकेट चाहत्यांची निराशा केली. मात्र त्याने दिग्गजांच्या यादीत स्थान मिळवलं.  



विराटने 76 चेंडूत 5 चौकारांच्या मदतीने 45 धावांची खेळी केली. विशेष म्हणजे विराटने 38 वी धाव घेत त्याच्या कसोटी कारकिर्दीतील 8 हजार धावांचा टप्पा पूर्ण केला. विराट यासह 8 हजार धावा पूर्ण करणारा सहावा भारतीय ठरला.


टीम इंडिया प्लेइंग इलेव्हन : रोहित शर्मा (कॅप्टन), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार) मयंक अग्रवाल, हनुमा विहारी, विराट कोहली, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, जयंत यादव आणि मोहम्मद शमी.


श्रीलंका प्लेइंग इलेव्हन :  दिमुथ करुणारत्ने (कर्णधार), लाहिरू थिरिमाने, पथुम निसांका, चरिथ असालंका, अँजेलो मॅथ्यूज, धनंजया डी सिल्वा, निरोशन डिकवेला (विकेटकीपर), सुरंगा लकमल, विश्व फर्नांडो, लसिथ एम्बुल्डेनिया आणि लाहिरू कुमारा