India vs SL 2nd ODI : टीम इंडियाच्या गोलंदाजीसमोर श्रीलंका (india vs sri lanka) संघाने शरणागती पत्करली आहे. प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेचा संघ 40 ओव्हर आधीच 215 धावा करून ऑल आऊट झाला आहे.श्रीलंका संघाकडून सर्वाधिक धावा नुवांदु फर्नांडो याने केल्या आहेत. तर टीम इंडियाकडून मोहम्मद सिराज, कुलदिप यादवने प्रत्येकी 3 विकेट घेतल्य़ा आहेत. तर उमरान मलिकने (Umran Malik) 2 आणि अक्षर पटेलने 1 विकेट घेतली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

श्रीलंकेचा कर्णधार दासून शनाकाने (dasun shanaka) टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. मात्र श्रीलंकेची सुरूवात चांगली झाली नव्हती. श्रीलंकेकडून अविष्का फर्नाडों (avishka fernando) आणि नुवांदु फर्नांडो सलामीला उतरले होते.मात्र श्रीलंकेचा सलामीवीर अविष्का फर्नाडों 20 धावा करून बाद झाला. त्यानंतर मैदानात उतरलेल्या कुसल मेंडीसने डाव सांभाळण्याचा प्रयत्न केला होता. दोघांनी काही अंशी डाव सांभाळला तर होता मात्र त्यांना मोठ्या धावसंख्या गाठता आली. कुसल मेंडीस 34 धावा करून बाद झाला. त्यानंतर दुनिथ वेलालगेने 32 धावा केल्या होत्या. तर नुवांदु फर्नांडोने अर्धशतक ठोकले आहे.या खेळाडूं व्यतिरीक्त एकाही खेळाडूचा टीम इंडियाच्या गोलंदाजांसमोर निभाव लागला नाही. आणि श्रीलंकेचा संघ 39.4 ओव्हरमध्ये 215 वर ऑल आऊट झाला. 


टीम इंडियाकडून मोहम्मद सिराज, कुलदिप यादवने (Kuldeep yadav) प्रत्येकी 3 विकेट घेतल्य़ा आहेत. तर उमरान मलिकने 2 आणि अक्षर पटेलने 1 विकेट घेतली आहे. दरम्यान आता टीम इंडियासमोर (Team India) 216 धावांचे लक्ष्य असणार आहे. आता हे लक्ष्य टीम इंडिया पूर्ण करते की त्यांना रोखण्य़ात श्रीलंका यशस्वी ठरते, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. तीन सामन्याच्या वनडे मालिकेत टीम इंडिया 1-0 ने आघाडीवर आहे, आता दुसऱ्या सामन्यात कोण बाजी याकडे क्रिकेट फॅन्सचे लक्ष लागले आहे.