IND vs SL 2nd T20: Team India च्या प्लेइंग 11 मध्ये `हा` स्टार खेळाडू IN, संघाला दणदणीत विजय मिळवून देणार!
Ind vs Sl 2nd T20 Live Update : आज भारत आणि श्रीलंका यांच्यातील दुसरा टी-20 सामना होणार आहे. पहिला सामना अतिशय काटेकोर झाला आणि शेवटी टीम इंडियाने श्रीलंकेचा पराभव केला. मात्र आता दुसऱ्या सामन्यासाठी संघात मोठे बदल निश्चित केले जावु शकतात.
IND vs SL T20 Live Streaming : भारत आणि श्रीलंका या संघात सध्या 3 सामन्यांची टी-20 मालिका सुरू आहे. पहिल्या सामन्यात भारताने 2 धावांनी विजय मिळवला आहे. आता या मालिकेतील भारत आणि श्रीलंका (Ind vs Sl) यांच्यातील दुसरा टी-20 सामना पुण्यात होणार आहे. मुंबईत झालेल्या पहिल्या लढतीत भारताने (team India) विजय मिळवला आणि मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. आता आज होणाऱ्या दुसऱ्या सामन्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. कारण दुसऱ्या सामन्यासाठी संघात दोन मोठे बदल होऊ शकता. श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या सामन्यात टीम इंडियाचा एक स्टार खेळाडू दुखापतीमुळे खेळू शकला नव्हता. मात्र आता हा खेळाडू तंदुरुस्त झाला असून हा खेळाडू दुसऱ्या टी-२०मध्ये खेळू शकतो.
या खेळाडूच संघात पुनरागमन
भारताचा स्टार डावखुरा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंह (Arshdeep Singh) तापामुळे श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या टी-20 सामन्यात खेळू शकला नव्हता. नाणेफेकीच्या वेळी कर्णधार हार्दिक पंड्याने (Hardik Pandya) अर्शदीप सिंह आजारी असल्याने तो खेळू शकणार नसल्याचे सांगितले होते. मात्र हा खेळाडू पूर्णपणे तंदुरुस्त झाला असून दुसऱ्या टी-20 मध्येही पुनरागमन करत आहे. तर दुसरीकडे अर्शदीप भारतासाठी प्लेइंग इलेव्हनमध्ये परतला तर तो प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणाला स्थान देणार हा सर्वात मोठा पेचप्रसंग असेल. शिवम मावी आणि उमरान मलिक यांनी पहिल्या T20 सामन्यात चांगली कामगिरी केली. अशा स्थितीत हर्षल पटेलला वगळले जाण्याची शक्यता आहे.
वाचा : भारत विरुद्ध श्रीलंका दुसरा टी-20 सामना पाहा फ्रीमध्ये, सामना कधी, कुठे आणि केव्हा? जाणून घ्या
T20 विश्वचषकात अप्रतिम कामगिरी
अर्शदीप सिंगने 2022 च्या टी 20 विश्वचषकात अप्रतिम कामगिरी केली होती. 2022 च्या T20 विश्वचषक स्पर्धेत त्याने भारतीय संघासाठी 10 विकेट्स घेतल्या आहेत. त्याचबरोबर त्याने टीम इंडियासाठी आतापर्यंत 33 टी-20 सामने खेळले आहेत. परिणामी हर्षल पटेलचे संघातील स्थान धोक्यात आले आहे. हर्षल पटेल डेथ ओव्हर्समध्ये सतत धावा खात आहे. या गोलंदाजाने त्याच्या 4 षटकात 10.25 च्या सरासरीने 41 धावा दिल्या. त्यादरम्यान हर्षलने 2 विकेट्स घेतल्या. मात्र इतर तरुण गोलंदाजांनी त्याला चांगली गोलंदाजी दिली.
अशी असू शकते टीम इंडियाचे प्लेइंग 11
शुभमन गिल, इशान किशन, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या (कर्णधार), राहुल त्रिपाठी, दीपक हुडा, अक्षर पटेल, युझवेंद्र चहल, शिवम मावी, अर्शदीप सिंह आणि उमरान मलिक.