Ind Vs SL 2nd T20:टीम इंडियाने श्रीलंकेविरूद्ध (india vs sri lanka)पहिला टी20 सामना अवघ्या 2 धावांनी जिंकला आहे. या विजयानंतर टीम इंडियाने मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली आहे. या सामन्यानंतर आता दुसरा टी20 सामना गुरुवारी पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर (maharashtra cricket association stadium pune)रंगणार आहे. या सामन्याचा पिच रिपोर्ट काय असणार आहे? आणि हवामानाच अंदाज काय सांगतो? हे जाणून घेऊयात. 


कसा रंगला सामना?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पहिल्या T20 सामन्यात टीम इंडियाने (Team India) प्रथम फलंदाजी करत निर्धारित 20 षटकात 5 गडी गमावून 162 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात श्रीलंकेचा (Sri lanka) संघ शेवटच्या चेंडूवर 160 धावा करून ऑलआऊट झाला होता. गोलंदाज शिवम मावीने पदार्पणाच्या सामन्यात 4 विकेट घेऊन टीम इंडियाच्या विजयात मोलाची भूमिका बजावली होती. 


हे ही वाचा : LIVE सामन्यादरम्यान खेळाडूने मैदानात मागवली सिगारेट, VIDEO व्हायरल


पिच रिपोर्ट 


एमसीए स्टेडियमच्या खेळपट्टीवर फलंदाजांचे नेहमीच वर्चस्व राहिले आहे. उसळी देणाऱ्या या खेळपट्टीवर काळ्या मातीचा वापर करण्यात आला आहे. इथली खेळपट्टी सपाट आहे, त्यामुळे फलंदाजांना मजा येणार आहे. मात्र, नवीन बॉलमुळे वेगवान गोलंदाजांना काहीसा त्रास होऊ शकतो. येथील पहिल्या डावातील सरासरी धावसंख्या 171 आहे. यावरून हे सिद्ध होते की खेळपट्टी फलंदाजांसाठी सोपी होणार आहे.


हे ही वाचा : श्रीलंकेविरूद्ध गोलंदाजीत कमाल आता Networthची चर्चा


हवामानाचा अंदाज काय? 


टीम इंडिया आणि श्रीलंका (india vs sri lanka) यांच्यातील दुसरा T20 आंतरराष्ट्रीय सामना गुरुवारी संध्याकाळी 7 वाजता सुरू होईल. सामन्याचा नाणेफेक अर्धा तास आधी होईल. पुण्यातील हवामान स्वच्छ असल्याने चाहत्यांना संपूर्ण सामना पाहता येणार आहे. पुण्यात संध्याकाळी तापमान 27 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे. येथे आर्द्रता 44 टक्के राहील तर वारा 14 किमी प्रतितास वेगाने वाहण्याचा अंदाज आहे. पुण्यात पावसाने खेळ केला नाही तर सामना रोमांचक होईल अशी अपेक्षा आहे.


हे ही वाचा : Team Indiaच्या 'या' महिला क्रिकेटर्स आहेत खुपच बोल्ड, पाहा Photo


दरम्यान टीम इंडियाने (Team India)पहिला सामना जिंकून मालिकेत 1-0 ने आघाडी घेतलीय.तर आता दासुन शनाकाच्या नेतृत्वाखालील श्रीलंकेच्या संघाला दुसरा सामना जिंकून मालिकेत बरोबरी साधायची आहे. त्याचवेळी भारतीय संघ मालिकेवर कब्जा करण्याच्या इराद्याने मैदानात उतरणार आहे.त्यामुळे आता दुसरा सामना कोण जिंकते हे आता सामन्यातच कळणार आहे.