Shivam mavi : श्रीलंकेविरूद्ध गोलंदाजीत कमाल आता Networthची चर्चा

Shivam mavi Net Worth : मावीला 2018 मध्ये केकेआरने 3 कोटी रुपयांना विकत घेतले होते.तर गेल्या वर्षीच्या मेगा लिलावात केकेआरने या गोलंदाजावर 7.25 कोटी रुपये खर्च केले होते. यंदाच्या वर्षापासून तो गुजरात टायटन्सकडून खेळणार आहे.

Jan 04, 2023, 16:24 PM IST

Shivam mavi Net Worth :टीम इंडियाने श्रीलंकेविरूद्धचा पहिला टी20 सामना अवघ्या 2 रनने जिंकला. टीम इंडियाच्या विजयात शिवम मावीने मोलाची भूमिका निभावली.टी20 सामन्यात आंतरराष्ट्रीय पदार्पण करणाऱ्या शिवम मावीने श्रीलंकेविरूद्ध उत्कृष्ट गोलंदाजी करत 4 विकेट घेतले. त्याच्या या कामगिरीमुळे टीम इंडियाला श्रीलंकेविरूद्ध पहिला सामना जिंकला आला होता. आता त्याच्या या कामगिरीची क्रिकेट वर्तुळात चर्चा आहे.  

1/5

Shivam mavi

टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज शिवम मावीने मंगळवारी टी20 फॉरमॅटमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले.  श्रीलंकेविरुद्ध पहिला सामना खेळून त्याने उत्कृष्ट कामगिरी केली. आपल्या पहिल्याच सामन्यात त्याने 4 विकेट घेत संघाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली होती.

2/5

Shivam mavi

शिवम मावीने आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले असले तरी तो बराच काळ आयपीएलमध्ये खेळत होता. मुळचा नोएडाचा असलेला मावी आयपीएल आणि ब्रँड एंडोर्समेंटमधून बक्कळ कमाई करतो. 

3/5

Shivam mavi

शिवम मावीची एकूण संपत्ती किती आहे, याची नेमकी आकडेवारी मिळत नाही, परंतु अनेक मीडिया रिपोर्ट्समध्ये असा दावा करण्यात आला आहे की, त्याची एकूण संपत्ती सूमारे 40 कोटी रुपये आहे.

4/5

Shivam mavi

मावीला 2018 मध्ये केकेआरने 3 कोटी रुपयांना विकत घेतले होते.तर गेल्या वर्षीच्या मेगा लिलावात केकेआरने या गोलंदाजावर 7.25 कोटी रुपये खर्च केले होते. यंदाच्या वर्षापासून तो गुजरात टायटन्सकडून खेळणार आहे. गुजरात त्याला एका हंगामासाठी 6 कोटी रुपये देणार आहे. याशिवाय त्याला भारत अ संघाकडून खेळण्यासाठी मॅच फी दिली जाते.

5/5

Shivam mavi

शिवम मावी लक्झरी कारचा देखील शौकीन आहे. मावीकडे ऑडी A5 कार आहे.शिवाय त्याने बीएमडब्ल्यूही खरेदी केली आहे.