IND vs SL 2nd T20 : भारत आणि श्रीलंकेमध्ये दुसरा टी-20 (IND vs SL 2nd T20) सामनाही रोमांचक झाला. थरारक सामन्यामध्ये भारताचा 16 धावांनी पराभव झाला. सामन्याचा खरा हिरो ठरला तो श्रीलंका संघाचा कर्णधार दसुन शनाका. (Dasun Shanaka fastest fifty) शनाकाने सामन्याच्या शेवटच्या षटकांमध्ये आक्रमक फटकेबाजी करत 22 चेंडूंमध्ये नाबाद 56 धावा केल्या. या खेळीच्या जोरावर शनाकाने संघाला 200 चा आकडा पार करून दिला. अवघ्या 20 चेंडूत त्याने वादळी अर्धशतक केलं. शनाका वेगवान अर्धशतक करणारा श्रीलंकेचा पहिला खेळाडू ठरला आहे. (IND vs SL 2nd T20 Shanaka scored the fastest fifty latest marathi sport news)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शनाकाने 20 चेंडूत अर्धशतक करत श्रीलंकेच्या दोन दिग्गज खेळाडूंचा रेकॉर्ड मोडीत काढला आहे. श्रीलंकेकडून सर्वात कमी चेंडूत अर्धशतक ठोकणारा शनाका पहिला खेळाडू ठरला आहे. याआधी हा विक्रम माहेला जयवर्धने आणि कुमार संगकारा यांच्या नावावर होता. संगकारा आणि जयवर्धेने दोघांनीही 21 चेंडूत वेगवान अर्धशतक झळकवलं होतं. 2007 साली माहेलाने केनियाविरूद्ध तर 2009 साली संगकाराने नागपूरमध्ये भारताविरूद्ध अर्धशतक केलं होतं. 


दसुन शनाकाने फक्त 20 चेंडूत अर्धशतक करत हा विक्रम मोडला आहे. शनाकाने 6 सिक्स आणि 2 चौकारांच्या मदतीने दमदार 56 धावांची खेळी केली. शनाकाची खेळीने श्रीलंका संघाला भारताविरूद्ध 200 आकडा पार करून दिला. शेवटच्या षटकात भारताला 22 धावांची गरज होती. मात्र शनाकाने स्वत: गोलंदाजी करत अवघ्या 4 धावा दिल्या आणि 2 विकेट्स घेतल्या. 


दरम्यान, श्रीलंकेच्या 207 धावांचा पाठलाग करताना टीम इंडियाला निर्धारित 20 षटकात 190 धावा करता आल्या. श्रीलंकेने या विजयासह टी-20 मालिकेमध्ये बरोबरी साधली आहे.