Yashasvi Jaiswal Records : श्रीलंका विरुद्ध टीम इंडिया दुसरा सामना रविवारी 28 जुलै रोजी म्हणजेच आज खेळवण्यात येणार आहे. काल झालेल्या सामन्यात टीम इंडियाने श्रीलंकेचा 43 धावांनी पराभव केला. भारतीय फलंदाजांनी 213 धावा केल्या होत्या, त्याला उत्तर देताना श्रीलंकेचा संघ 170 धावांमध्ये गारद झाला. कालच्या सामन्यात यशस्वी जयस्वालकडे इतिहास रचण्याची मोठी संधी होती. मात्र, तो 40 धावा करून बाद झाला. अशातच आता आजच्या सामन्यात जर यशस्वी जयस्वालने 7 धावा केल्या तर तो इतिहास रचणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आजच्या सामन्यात स्टार भारतीय सलामीवीर यशस्वी जयस्वालला 2024 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 1000 धावा करणारा जगातील पहिला फलंदाज बनण्याची संधी असेल. 22 वर्षांच्या यशस्वीने आतापर्यंत खेळलेल्या 11 सामन्यांच्या 16 डावांमध्ये 953 धावा केल्या आहेत.


दरम्यान, या यादीत दुसऱ्या स्थानावर श्रीलंकेचा कुसल मेंडिस आहे, ज्याने 25 सामन्यांच्या 27 डावात 878 धावा केल्या आहेत. तर टीम इंडियाचा माजी टी-ट्वेंटी कॅप्टन रोहित शर्माने 17 सामन्यांच्या 22 डावांमध्ये 833 धावांसह चौथ्या स्थानावर आहे.



श्रीलंका टीम: चरिथ असलांका (कॅप्टन), पथुम निसांका, कुसल परेरा ,अविष्का फर्नांडो, कुसल मेंडिस, दिनेश चांदीमल, कामिंदु मेंडिस, दासुन शनाका, वानिंदु हसरंगा, दुनिथ वेल्लालागे ,महेश तीक्षाना,चामिंडु विक्रमसिंघे, मथीशा पथिराना, बिनुरा फर्नांडो, दिलशान मधुशंका आणि असिथा फर्नांडो


टीम इंडिया: सूर्यकुमार यादव (कर्णधार), शुबमन गिल (उपकर्णधार), यशस्वी जयसवाल, रिंकू सिंह, रियान पराग, ऋषभ पंत (विकेटकीपर), संजू सॅमसन (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, वॉशिंगटन सुंदर, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंह, खलील अहमद आणि मोहम्मद सिराज.