मुंबई : भारत विरुद्ध श्रीलंका दोन कसोटी सामन्यांची सीरिज सुरू आहे. टीम इंडियाने 1-0 ने आघाडी घेतली आहे. टीम इंडियामधील एका खेळाडूचं करियर धोक्यात असल्याचं दिसत आहे. टीम इंडियासाठी हा खेळाडू व्हिलन ठरला आहे. त्यामुळे त्याचा पत्ता कट होण्याची शक्यता आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ही शेवटची टेस्ट
श्रीलंके विरुद्ध कसोटी सामन्यात ओपनिंग फलंदाज मयंक अग्रवालची कामगिरी अत्यंत वाईट असल्याचं दिसत आहे. श्रीलंकेविरुद्धची सीरिज त्याच्यासाठी अखेरची ठरू शकते. रहाणे आणि पुजारा या दोघांनंतर आता आणखी एक खेळाडू संघातून बाहेर पडणार आहे. 


श्रीलंका विरुद्ध 2 कसोटी सामन्यांच्या सीरिजमध्ये या खेळाडूची कामगिरी काही विशेष राहिली नाही. ही सीरिज त्याच्यासाठी शेवटची ठरू शकते. विराटचा खास खेळाडू मयंक अग्रवालसाठी ही सीरिज अखेरची ठरू शकते. श्रीलंके विरुद्धच्या सामन्यात त्याला ओपनिंगसाठीही संधी देण्यात आली नाही. त्याचा खराब फॉर्म पुन्हा सर्वांना पाहायला मिळाला. 


गेल्या 8 डावांमध्ये एकदाही मयंक अग्रवालला अर्धशतक करण्यात यश आलं नाही. के एल राहुलला दुखापत झाल्याने मयंकला संघात स्थान मिळालं. मात्र त्याला चांगली कामगिरी करण्यात यश आलं नाही. मयंक अग्रवालने 33, 4 आणि 22 धावा केल्या आहेत. त्याच्या खराब फॉर्ममुळे त्यालाही डिच्चू दिला जाऊ शकतो. 


मयंक अग्रवाल ऐवजी के एल राहुलला संघात संधी दिली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता मयंक अग्रवाल आपल्या खराब फॉर्ममुळे स्वत: संधी मिळूनही चांगलं खेळू शकला नाही. त्याने स्वत:आपल्या करियरमध्ये अडथळे निर्माण केला आहे.