मुंबई : टीम इंडिया विरुद्ध श्रीलंका यांच्यात दुसरा कसोटी  (India vs Sl 2nd Test Match) सामना खेळवण्यात येत आहे. रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वात टीम इंडियाने पहिला सामना जिंकत 2 सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली आहे. या दुसऱ्या सामन्यात टीम इंडिया लंकेला व्हाईट वॉश देण्याच्या प्रयत्नात आहे. मात्र या मालिकेनंतर क्रिकेट चाहत्यांसाठी एक स्टार खेळाडू निवृत्तीची घोषणा करणार आहे. (ind vs sl 2nd test match sri lanka faster bowler suranga lakmal will retire after pink ball day night test match)
  
दुसऱ्या कसोटीनंतर निवृत्त


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यातील दुसऱ्या सामन्यानंतर हा खेळाडू निवृत्ती घेत असल्याचं जाहीर करणार आहे.  हा खेळाडू 2009 पासून क्रिकेट खेळतोय. आता खेळाडूने क्रिकेटला रामराम करण्याचा निर्णय घेतला आहे.   


हा खेळाडू दुसरा तिसरा कोणी नसून श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज सुरंगा लकमल आहे. लकमनलचं याआधीच क्रिकेटला अलविदा करण्याचं ठरवलं होतं. दुसऱ्या सामन्यासाठी सुरंगा मैदानात उतरला, तेव्हा त्याला सहकारी खेळाडूंनी गार्ड ऑफ ऑनर दिला. 


सुरंगा लकमलची कारकिर्द 


सुरंगा लकमलने (Suranga Lakmal)  2009 मध्ये टीम इंडिया विरुद्ध पदार्पण केलं होतं. सुरंगाने श्रीलंकेचं तिन्ही फॉर्मेटमध्ये प्रतिनिधित्व केलं आहे.  


सुरंगाने 2009 मध्ये टीम इंडिया विरुद्ध एकदिवसीय पदार्पण केलं होतं. लकमलने आतापर्यंत 68 कसोटी सामन्यांमध्ये 168 विकेट्स घेतल्या आहेत. लकमलने यामध्ये  4 वेळा एका डावात 5 विकेट्स घेण्याचा कारनामा केला आहे.


तसेच 86 वनडेमध्ये 109 फलंदाजांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला आहे. तर 11 टी 20 मॅचमध्ये 8 बळी घेतल्या. लकमलने टीम इंडिया विरुद्ध 2 टेस्टमध्ये 8,  11 वनडेत 9 विकेट्स घेतल्या.