पुणे : विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने 2020 वर्षातील पहिला विजय मिळवला आहे. एकदंरीत टीम इंडियाची सुरूवात विजयाने झाली आहे. श्रीलंकेविरूद्ध तिसऱ्या टी20 सामन्यात टीम इंडियाने 78 धावांनी विजयश्री खेचून आणली आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यावर पावसाचं पाणी फिरलं होतं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

श्रीलंकेला भारताने विजयासाठी दिलेलं 202 धावांचं आव्हान अखेर पार करता आलं नाही. श्रीलंकेच्या टीमने 123 धावांवर गाशा गुंडाळला. श्रीलंकन्सकडून डी सिल्वाने 57 तर अँजलो मॅथ्यूने 31 धावा करत टीम इंडियाला टक्कर दिली.


श्रीलंकेला भारताने जे आव्हान दिलं होतं, ते मिळवण्यात यश न येण्याचं आणखी एक कारण म्हणजे सुरूवातीलाच खराब खेळी. श्रीलंकेचे पहिले 4 बॅटसमन अवघ्या 26 धावांत परतले. 


यानंतर अँजलो मॅथ्यूज आणि डी-सिल्वा यांनी अर्धशतकी भागीदारी करत संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पण ही जोडी फुटली आणि श्रीलंकेचा डाव कोलमडला. टीम इंडियाकडून नवदीप सैनीने 3, शार्दुल ठाकूरने आणि सुंदरने प्रत्येकी 2-2 विकेट घेतल्या.