हार्दिक पांड्याला टीममधून बाहेर केल्यानंतर केलं खास ट्विट
टीम इंडियाचा ऑलराऊंडर हार्दिक पांड्या याला श्रीलेकेविरोधात होणाऱ्या आगामी सीरिजसाठी विश्रांती देण्याचा निर्णय घेण्यात आला.
नवी दिल्ली : टीम इंडियाचा ऑलराऊंडर हार्दिक पांड्या याला श्रीलेकेविरोधात होणाऱ्या आगामी सीरिजसाठी विश्रांती देण्याचा निर्णय घेण्यात आला.
टीममध्ये सहभागी न केल्यावर हार्दिक पांड्याने एक खास ट्विट केलं आहे.
न्यूझीलंड विरोधात तिरुअनंतपुरममध्ये तिसरी टी-२० मॅच खेळत असताना पांड्या जखमी झाला. टीम मॅनेजमेंटने हार्दिक पांड्याला नॅशनल क्रिकेट अकॅडमीत पाठवण्याचा निर्णय घेतला. या ठिकाणी हार्दिक आपल्या फिटनेसवर लक्ष देणार आहे.
आता, हार्दिक पांड्याने नव्या रुपात ट्विटरवर आपल्या चाहत्यांसमोर एन्ट्री केली आहे. हार्दिकने ट्विटर अकाऊंटच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांशी संवाद साधला.
हार्दिकने ट्विट करत म्हटलं की, "परिवर्तनाला घाबरु नका, हा बदल तुम्हाला नवी सुरुवात करण्यासाठी मदत करेल".
न्यूझीलंडविरोधात तिसऱ्या आणि शेवटच्या टी-२० मॅचमध्ये शेवटची ओव्हर हार्दिक पांड्या टाकत होता. या ओव्हरच्या दुसऱ्या बॉलमध्ये न्यूझीलंडच्या ग्रँड होम याची कॅच पकडताना पांड्या जखमी झाला.
त्यावेळी दुखापत झाली असतानाही हार्दिक पांड्याने आपली बॉलिंग टाकली. हार्दिकने केवळ बॉलिंगच टाकली नाही तर न्यूझीलंडला विजय मिळवण्यापासून रोखलं.
हार्दिक पांड्याला श्रीलंकाविरोधात पहिल्या दोन टेस्ट मॅचेसमध्ये आराम देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.