ind vs sl : दिवस प्रत्येकाचे येतात! जडेजाला आता वाटतेय भीती? मॅचनंतरचं ट्विट होतंय व्हायरल
अक्षरच्या अष्टपैलू कामगिरीमुळे त्याच्या नावाची जोरदार चर्चा होत आहे. अक्षर आपल्या कामगिरीने संघातील जागा पक्की करत असल्याचं दिसत आहे. त्यामुळे जडेजा संघात येणं जड जावू शकतं. या चर्चा चालू असताना रविंद्र जडेजाने एक ट्विट केलं आहे ज्याचं चाहत्यांनी थेट कनेक्शन अक्षरसोबत जोडलं आहे.
IND vs SL : भारताचा स्टार खेळाडू रविंद्र जडेजा (Ravindra Jadeja) वर्षभरापासून संघापासून दूर आहे. आशिया कपआधी जडेजा दुखापतीमुळे बाहेर झाला त्यानंतर त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. जडेजा दुखापतीमुळे आशिया कप आणि टी-20 वर्ल्ड कपला मुकला. जडेजाच्या जागी संघात संधी मिळालेल्या अक्षर पटेलने संधीचं सोनं केलं आहे. श्रीलंकेविरूद्धच्या टी-20 आणि एकदिवसीय मालिकेत अक्षरने कमाल कामगिरी केली आहे. (ind vs sl ravindra jadeja tweet viral axar patel latest marathi sport news)
काल म्हणजेच गुरूवारी झालेल्या सामन्यातही अक्षरने तब्बल तीन कॅच, विकेट आणि छोटेखानी महत्त्वाची खेळी केली. अक्षरच्या अष्टपैलू कामगिरीमुळे त्याच्या नावाची जोरदार चर्चा होत आहे. अक्षर आपल्या कामगिरीने संघातील जागा पक्की करत असल्याचं दिसत आहे. त्यामुळे जडेजा संघात येणं जड जावू शकतं. या चर्चा चालू असताना रविंद्र जडेजाने एक ट्विट केलं आहे ज्याचं चाहत्यांनी थेट कनेक्शन अक्षरसोबत जोडलं आहे.
जडेजा काय म्हणाला?
भारत आणि श्रीलंकेमधील दुसऱ्या सामन्यानंतर जडेजाने, काही बोलू नका, फक्त स्माईल करत रहा, असं म्हटलं आहे. भारताने सामना जिंकल्यावर जडेजाने ट्विट केल्याने ते व्हायरल झालं आहे. जडेजालाअक्षरच्या दमदार प्रदर्शनामुळे संघात पुनरागमन करण्यासाठी कठीण जावू शकतं. अक्षरला खेळताना पाहून जडेजालाही असंच काहीसं वाटलं असावं म्हणून त्याने हे ट्विट केल्याची चर्चा क्रीडा वर्तुळात आहे.
दरम्यान, अक्षरनेही ज्यावेळी संघाला गरज आहे त्यावेळी तो धावून आला आहे. आता पाहायला गेला तर जडेजाच्या अनुपस्थितीमध्ये एकमेक तोच चांगला पर्याय आहे. अक्षरने आतापर्यंत 8 कसोटींमध्ये 47 विकेट्स घेतल्या आहेत. यामध्ये त्याने दोनवेळा 5 विकेट्स घेतल्या आहेत. 43 एकदिवसीय सामन्यात 55 विकेट्स आणि 349 धावा केल्या आहेत. टी-20 मध्ये 288 धावांसह त्याने 37 विकेट्स घेतल्या आहेत.