या धडाकेबाज खेळाडूंसह मैदानात उतरणार टीम इंडिया, पाहा संभाव्य प्लेइंग इलेव्हन
कर्णधार रोहित शर्मा कोणाला खेळण्याची संधी देणार? युवा खेळाडूंचा सर्वाधिक समावेश; पाहा संभाव्य प्लेइंग इलेव्हन
मुंबई : भारत विरुद्ध श्रीलंका आज पहिला टी 20 सामना लखनऊ इथे होणार आहे. आज संध्याकाळी 7 वाजता या सामन्याला सुरुवात होणार आहे. 6.30 वाजता टॉस होईल. टी 20 च्या पहिल्या सामन्यासाठी नागरिकांना स्टेडियममध्ये परवानगी नाही. दुसऱ्या आणि तिसऱ्या सामन्यासाठी मात्र ही परवानगी देण्यात आली आहे.
श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या टी 20 सामन्यात तीन मोठे बदल करण्यात आले आहेत. संपूर्ण युवा टीम घेऊन रोहित शर्मा मैदानात उतरणार आहे. विराट कोहलीला या सामन्यासाठी आराम देण्यात आला आहे. रिषभ पंत देखील खेळणार नाही. तर सूर्यकुमार यादव आणि दीपक चाहर दुखापत झाल्याने संघातून बाहेर झाले आहेत.
विराट कोहली ऐवजी श्रेयस अय्यर मैदानात उतरणार आहे. तर रिषभ पंत ऐवजी संजू सॅमसन विकेटकिपिंगची धुरा सांभाळेल अशी चर्चा आहे. रविंद्र जडेजा मैदानात खेळताना दिसणार आहे. तर भुवी आणि बुमराह देखील या सामन्यात असतील.
टीम इंडिया संभाव्य प्लेइंग इलेव्हन
रोहित शर्मा, ईशान किशन, श्रेयस अय्यर, संजू सॅमसन (विकेटकीपर), दीपक हुडा, रवींद्र जडेजा, वेंकटेश अय्यर, हर्षल पटेल, युजवेंद्र चहल, भुवनेश्वर कुमार आणि जसप्रीत बुमराह.
व्यंकटेश अय्यर, शार्दुल ठाकूरकडे ऑलराऊंडर म्हणून पाहिलं जाण्याची शक्यता आहे. त्यांना दोन्ही भूमिका चोख पार पाडाव्या लागणार आहेत. युवा टीम असल्याने रोहित शर्मासमोर मोठं आव्हान आणि तेवढेच कठोर निर्णय घेणं अशा दोन गोष्टी समोर असणार आहेत.
टी 20 सामन्यांचं कसं असणार शेड्युल
पहिला टी 20 सामना - 24 फेब्रुवारी- लखनऊ (वेळ - संध्याकाळी 7 वाजता)
दुसरा टी 20 सामना - 26 फेब्रुवारी- धर्मशाळा (वेळ - संध्याकाळी 7 वाजता)
तिसरा टी 20 सामना - 27 फेब्रुवारी- धर्मशाळा (वेळ - संध्याकाळी 7 वाजता)