मुंबई : टीम इंडियाने वेस्ट इंडिजचा (India vs West Indies) वनडे आणि टी 20 सीरिजमध्ये क्लीन स्वीपने विजय मिळवला. रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वात टीम इंडियाने हा कारनामा केला. यानंतर आता टीम इंडियाचं लक्ष हे श्रीलंका विरुद्धच्या मालिकेकडे आहे. श्रीलंका भारत दौऱ्यात टीम इंडिया विरुद्ध 3 सामन्यांची टी 20 मालिका आणि 2 टेस्ट मॅचची सीरिज खेळणार आहे. (ind vs sl t20 series hitman rohit sharma have chance to makes world record about most t 20 sixes and runs)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

श्रीलंका विरुद्धच्या या टी 20 मालिकेत हिटमॅन रोहित शर्माला रेकॉर्ड ब्रेक करत विश्वविक्रम आपल्या नावे करण्याची संधी आहे. रोहितला हा रेकॉर्ड आपल्या नावावर करण्यासाठी अवघ्या 12 सिक्सची गरज आहे.


टी 20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक सिक्स (Most Sixes In T 20I) मारण्याचा विक्रम हा न्यूझीलंडच्या मार्टिन गुप्टीलच्या (Martin Guptill) नावावर आहे. गुप्टीलने आतापर्यंत 112 सामन्यांमध्ये 165 सिक्स खेचले आहेत. 


तर हिटमॅनने 112 सामन्यात 154 गगनचुंबी सिक्स लगावले आहे. त्यामुळे रोहित 12 सिक्स लगावल्यानंतर तो टी 20 क्रिकेटमधील सिक्सर किंग म्हणून ओळखला जाईल. रोहितला श्रीलंका विरुद्धच्या टी 20 मालिकेत हा वर्ल्ड रेकॉर्ड करण्याचा चान्स आहे. 


सर्वाधिक सिक्स कोणाच्या नावे?


मार्टिन गुप्टील (न्यूझीलंड) - 165 सिक्स
रोहित शर्मा (टीम इंडिया) - 154 सिक्स
ख्रिस गेल (विंडिज) - 124 सिक्स
इयोन मॉर्गन (इंग्लंड) -120 सिक्स


तसेच रोहितला टी 20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावांचा (Most Runs In T20I) वर्ल्ड रेकॉर्ड करण्याचीही सुवर्णसंधी आहे. यासाठी रोहितला फक्त 37 धावा हव्या आहेत. सध्या हा टी 20 मधील सर्वाधिक धावांचा विक्रमही गुप्टीलच्या नावावर आहे. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर विराट कोहली (Virat Kohli) आहे. पहिल्या आणि दुसऱ्या स्थानात अवघ्या 3 धावांचा फरक आहे.


टी 20 क्रिकेटमधील सर्वाधिक धावा  


मार्टिन गुप्टिल (न्यूझीलंड)- 3 हजार 299 धावा
विराट कोहली (टीम इंडिया) - 3 हजार 296 धावा
रोहित शर्मा (टीम इंडिया)- 3 हजार 263 रन 


पहिला सामना केव्हा? 


दरम्यान श्रीलंका विरुद्धच्या टी 20 मालिकेला 24 फेब्रुवारीपासून सुरुवात होत आहे. यानंतर दुसरा आणि तिसरा सामना हा अनुक्रमे 26 आणि 27 फेब्रुवारीला खेळवण्यात येणार आहे. यानंतर 2 सामन्यांची कसोटी मालिका खेळवण्यात येणार आहे. 


टी 20 सीरिजसाठी टीम इंडिया : रोहित शर्मा (कॅप्टन), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), ऋतुराज गायकवाड, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, संजू सॅमसन, इशान किशन (विकेटकीपर), व्यंकटेश अय्यर, दीपक चहर, दीपक हुडा, रवींद्र जाडेजा, युजवेंद्र चहल, रवी बिश्नोई, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल आणि आवेश खान.


कसोटी मालिकेसाठी टीम इंडिया :  रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), प्रियांक पांचाळ, मयंक अग्रवाल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, हनुमा विहारी, शुबमन गिल, ऋषभ पंत (विकेटकीपर), केएस भरत, रवींद्र जाडेजा, जयंत यादव, आर अश्विन, कुलदीप यादव, सौरभ कुमार, मोहम्मद सिराज, उमेश यादव आणि मोहम्मद शमी.