नागपूर : लागोपाठ होत असलेल्या क्रिकेट सीरिजमुळे बोर्डाच्या कारभारावर प्रश्न उपस्थित केलेल्या विराट कोहलीच्या दबावाचा परिणाम बघायला मिळू शकतो. त्याला श्रीलंका सीरिजमधून विश्रांती मिळण्याची पूर्ण शक्यता आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आज(सोमवारी) टीम इंडियाची निवड केली जाणार आहे. यात विराट कोहलीला आराम दिला जाण्याची चर्चा होत आहे. तर दक्षिण आक्रिके विरूद्ध होणा-या सीरिजसाठी जसप्रीत बुमराह आणि चायनामॅच गोलंदाज कुलदीप यादव यांना संधी मिळण्याची शक्यता आहे. 


चार संघांची निवड


निवड समिती आज ४ वेगवेगळ्या संघांची घोषणा करणार आहेत. यातील एक संघ श्रीलंके विरूद्धच्या तिस-या टेस्टसाठी असेल. तर त्यानंतर होणा-या एकदिवसीय आणि टी-२० आंतरराष्ट्रीय श्रॄंखलेसाठीही संघ निवडला जाईल. पण सर्वांच्या नजरा दक्षिण आफ्रिके विरूद्ध निवडल्या जाणा-या संघाकडे असेल.  


रोहित शर्माकडे नेतृत्व?


आयपीएलपासून लाग्गोपाठ क्रिकेट खेळत असलेल्या कोहलीला श्रीलंके विरूद्ध होत असलेल्या तीन वनडे आणि तीन टी-२० सामन्यांच्या सीरिजमधून आराम दिला जाईल. दरम्यान रोहित शर्माकडे टीमच्या नेतृत्वाची जबाबदारी सोपवली जाऊ शकते. त्यासोबतच २ डिसेंबरपासून श्रीलंके विरूद्ध होणा-या तिस-या आणि शेवटच्या टेस्टमधून बाहेर पडण्याचा निर्णय विराटने घेतला तर अजिंक्य रहाणेवर टीमची जबाबदारी असेल.


कुणाला मिळणार संधी?


टीम इंडियाचा मुख्य वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह हा निश्चित अतिरीक्त वेगवान गोलंदाज म्हणून दावेदार असेल. भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, उमेश यादव आणि इशांत शर्मा यांचीही निवड होणे जवळपास निश्चित आहे. 


सात बॅट्समनची निवड निश्चित


ऑलराऊंडर म्हणून हार्दिक पांड्या हा पाचवा वेगवान गोलंदाज म्हणूनही या यादीत असेल. अशात रविचंद्रन अश्विन किंवा रविंद्र जडेजा यांच्यासोबत स्पिनर कुलदीप यादव किंवा युजवेंद्र चहलची निवड होऊ शकते. सात बॅट्समनची निवड निश्चित आहे. ज्यात तीन सलामी बॅट्समन आणि चार मधल्या फळीतील बॅट्समनचा समावेश आहे. 


सलामी बॅट्समन


तीन सलामी बॅट्समनमध्ये लोकेश राहुल, शिखर धवन आणि मुरली विजय असेल. तर मधल्या फळीसाठी कर्णधार विराट कोहली, अजिंक्य रहाणे, रोहित शर्मा आणि चेतेश्वर पुजारा यांना संधी मिळणे निश्चित आहे. ऋद्धीमान साहा हा विकेटकीपर म्हणून पहिली पसंती असेल.