नवी दिल्ली :  श्रीलंका विरूद्ध टेस्ट सिरीजसाठी निवडण्यात आलेल्या भारतीय संघात हार्दिक पांड्याला निवडण्यात नाही आले. यामुळे अनेक प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोशल मीडियावर हार्दिकच्या फॅन्सने बीसीसीआय, कोच रवि शास्त्री आणि कर्णधार विराट कोहलीला टॅक करत अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत.  पांड्या ऑलराउंडर आहे मग का त्याला टीममध्ये सामील करण्यात आले नाही, असा सवाल उपस्थित केला आहे. 


या प्रश्नाचे उत्तर बीसीसीआयच्या ट्विटमध्ये मिळते. त्यात म्हटले की, हार्दिक पांड्याला रोटेशन पॉलीसी अंतर्गत टीममधून बाहेर करण्यात आले नाही. तर डॉक्टरांनी दिलेल्या सल्ल्यामुळे त्याला संघात स्थान देण्यात आले नाही.  त्याला डॉक्टरांनी आरामाचा सल्ला दिला आहे. 


बीसीसीआयने आपल्या अधिकृत वेबसाइटवर लिहिले की, गेल्या काही दिवसांपासून हार्दिकने खूप सामने खेळले आहेत. डॉक्टरांनी त्याला सतत न खेळण्याचा सल्ला दिला आहे. सतत मॅच खेळल्याने अशा खेळाडूला जखम होण्याची शक्यता असते. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून त्याला विश्रांती देण्यात आली आहे. या दरम्यान हार्दिक बंगळुरूच्या फिटनेस अकादमीत आपल्या फिटनेसवर काम करणार आहेत. 


पहिल्या दोन सामन्यांसाठी संघ - विराट कोहली (कर्णधार), लोकेश राहुल, मुरली विजय, शिखर धवन, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे(उपकर्णधार), रोहित शर्मा, वृद्धिमन साहा, आर. अश्विन, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, मोहम्मद शामी, उमेश यादव, भुवनेश्वर कुमार, इशांत शर्मा