मुंबई : वेस्ट इंडिज विरुद्ध आज पहिला सामना खेळवण्यात येत आहे. या सीरिजसाठी टीम इंडिया सज्ज आहे. नुकत्याच झालेल्या 3 सामन्यांच्या वन डे सीरिजमध्ये टीम इंडियाने विंडीजला व्हाईटवॉश दिला होता. आता टी 20 सीरिजमध्ये व्हाईटवॉश देण्यासाठी टीम इंडिया सज्ज आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वेस्ट इंडिजने टॉस जिंकून पहिल्यांदा बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला. तर टीम इंडियाला पहिल्यांदा फलंदाजी करावी लागणार आहे. टीम इंडियाच्या व्हाईटवॉशचा बदला घेण्यासाठी विंडीज सज्ज आहे. तर रोहित विंडीजला पराभूत करण्यासाठी कशी स्ट्रॅटेजी वापरणार याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे. 


टीम इंडिया प्लेइंग इलेव्हन
रोहित शर्मा, ऋषभ पंत, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, दिनेश कार्तिक, रविंद्र जडेजा, रवी बिश्नोई, भुवनेश्वर कुमार, आर अश्विन, अर्शदीप सिंह


रविंद्र जडेजा खेळणार असल्याने टीम इंडियाला मोठा दिलासा मिळाला आहे. तर ईशान किशनला टीममध्ये संधी दिली नाही. संजू सॅमसनलाही टीममध्ये खेळण्याची संधी मिळेल असं चाहत्यांना वाटलं होतं मात्र त्यालाही संधी देण्यात आली नाही. 


अर्शदीप सिंहला पहिल्या सामन्यासाठी संधी देण्यात आली आहे. तर रवि बिश्नोईला रोहित शर्मा या सामन्यात आजमावणार आहे. टी 20 वर्ल्ड कपच्या दृष्टीनं रोहित शर्मा टीमची बांधणी करत असल्याचं दिसत आहे.