कोलकाता : टीम इंडियाने (Team India) दुसऱ्या टी 20 सामन्यात वेस्ट इंडिजला (West Indies) विजयासाठी 187 धावांचे आव्हान दिले आहे. टीम इंडियाने निर्धारित 20 ओव्हरमध्ये 5 विकेट्स गमावून 186 धावांची खेळी केली. विराट कोहली (Virat Kohli) आणि रिषभ पंत (Rishabh Pant) या दोघांनी केलेल्या फटकेबाजीच्या जोरावर टीम इंडियाला 186 धावांपर्यंत मजल मारता आली.  (ind vs wi 2nd t 20i team india set 187 runs target to win west indies at eden garden kolkata)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विराट कोहलीने 41 चेंडूत 7 फोर आणि 1 सिक्सच्या मदतीने  52 धावांची खेळी केली. तर अखेरच्या काही षटकांमध्ये रिषभ पंत आणि व्यंकटेश अय्यर या जोडीने विंडिजच्या गोलंदाजांना धु धु धुतलं. 


रिषभने 28 चेंडूंमध्ये 7 फोर आणि 1 सिक्सच्या नाबाद 52 धावा केल्या. तर व्यंकटनेशने 18 बॉलमध्ये  नॉट आऊट 33 रन्स केल्या.  तर कर्णधार रोहित शर्माने 19 धावांची खेळी केली. विंडिजकडून रोस्टन चेस सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. तर रोमॅरियो शेफर्ड आणि शेल्डन कॉट्रेल या जोडीने प्रत्येकी 1 विकेट घेतला. 


कोण जिंकणार सामना?


टीम इंडिया 3 सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडीवर आहे. हा दुसरा सामना मालिकेच्या दृष्टीने निर्णायक आहे. टीम इंडियाला हा सामना जिंकून मालिका विजयाची सुवर्णसंधी आहे. तर विंडिजला मालिकेतील आव्हान कायम ठेवण्यासाठी हा सामना कोणत्याही परिस्थितीत जिंकणं भाग आहे. यामुळे हा सामना कोण जिंकणार, याकडे क्रिकेट विश्वाचं लक्ष लागून राहिलं आहे. 


टीम इंडिया प्लेइंग इलेव्हन :  रोहित शर्मा (कॅप्टन), ईशान किशन, विराट कोहली, रिषभ पंत (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, व्यंकटेश अय्यर, दीपक चहर, हर्षल पटेल, भुवनेश्वर कुमार, युझवेंद्र चहल आणि रवी बिश्नोई.


वेस्ट इंडिजचे शिलेदार :  किरॉन पोलार्ड (कर्णधार), ब्रँडन किंग, काइल मेयर्स, निकोलस पूरन (विकेटकीपर), रोव्हमन पॉवेल, जेसन होल्डर, ओडियन स्मिथ, रोस्टन चेस, अकेल होसेन, रोमॅरियो शेफर्ड आणि शेल्डन कॉट्रेल.