अहमदाबाद : भारत आणि वेस्ट इंडिज (India vs West indies) यांच्यात आज दुसरा आंतरराष्ट्रीय वनडे सामना खेळला जात आहे. या वेळी मैदानावर प्रेक्षक नसेल तरी खास पाहुणे उपस्थित आहेत. अलीकडेच, कॅरेबियन भूमीवर आयसीसी अंडर-19 विश्वचषक 2022 (U19 world cup 2022) जिंकणाऱ्या टीम इंडियाचे खेळाडू बुधवारी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये (Narendra Modi stadium) भारत आणि वेस्टमध्ये सुरु असलेल्या वनडे सीरीजचा दुसरा एकदिवसीय सामना पाहण्यासाठी दाखल झाले. (U19 Team present to watch India vs west india second match) 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यश धुलच्या नेतृत्वाखालील संघाने शनिवारी विश्वचषकाच्या अंतिम फेरीत इंग्लंडचा पराभव करून विक्रमी पाचव्यांदा ट्रॉफी जिंकली. संपूर्ण स्पर्धेत संघाने चमकदार कामगिरी केली. एकही सामना गमावला नाही.


विशेष म्हणजे अंडर-19 विश्वचषक जिंकल्यानंतर संघ मायदेशी पोहोचला आहे. हैदराबादमध्ये भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) खेळाडूंचा गौरव केला. यावेळी मुख्य प्रशिक्षक हृषीकेश कानिटकर आणि इतर सपोर्ट स्टाफ उपस्थित होते. याशिवाय टीम इंडियाचे माजी फलंदाज आणि राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे (NCA) प्रमुख व्हीव्हीएस लक्ष्मण, बीसीसीआयचे सचिव जय शाह, खजिनदार अरुण धुमाळ आणि राज्य क्रिकेट मंडळांचे काही वरिष्ठ अधिकारीही उपस्थित होते. या स्पर्धेदरम्यान लक्ष्मणही संघासोबत उपस्थित होता.



बोर्डाने प्रत्येक खेळाडूला 40 लाख आणि सपोर्ट स्टाफला 25 लाख देण्याची घोषणा केली आहे. अंडर-19 संघातील खेळाडू रोहित शर्मा आणि विराट कोहलीसह वरिष्ठ संघातील इतर खेळाडूंना भेटू शकणार नाहीत. कोविड प्रोटोकॉलमुळे ते त्यांना भेटू शकणार नाही. अंडर-19 विश्वचषक स्पर्धेत संघाला एकही सामना गमवावा लागला नसला तरी त्याला अनेक आव्हानांना सामोरे जावे लागले. 


आयर्लंडविरुद्धच्या साखळी सामन्यापूर्वी कर्णधार, उपकर्णधारासह अनेक खेळाडूंना कोरोनाचा फटका बसला होता. संघाला जेमतेम अकरा खेळाडू मैदानात उतरवता आले, पण त्यानंतरही एकही सामना गमावला नाही.