IND vs WI : टीम इंडिया (Team India) ने वेस्ट इंडिज संघाला 3-0 ने पराभवाचा धक्का देत अनेक रेकॉर्ड आपल्या नावे केले आहेत. कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) याच्या नेतृत्वात भारतीय संघाने वेस्टइंडिज संघाला टी20 सीरीजमध्ये क्लीन स्वीप दिला. याआधी वनडे सीरीज (IND vs WI) मध्ये देखील टीम इंडियाने 3-0 ने क्लीन स्वीप देत शानदार विजय साजरा केला. रोहित शर्माने यासह अनेक रेकॉर्ड आपल्या नावे केले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कर्णधारपद हाती घेतल्यानंतर रोहित शर्मा (Rohit Sharma) ने वेस्टइंडिज संघाच्या विरोधात (IND vs WI) वनडे आणि टी20 सीरीजमध्ये विजय मिळवला. टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यात कर्णधार रोहित शर्माने 25 पैकी 21 सामन्यांमध्ये विजय मिळवला. रोहित शर्मा यामुळे सर्वाधिक सामने जिंकणारा भारतीय कर्णधार बनला आहे. 


विराट कोहली (Virat Kohli) हा 25 पैकी 15 सामने जिंकून दुसऱ्या स्थानावर आहे. तर धोनी 12 सामन्यांसह तिसऱ्या स्थानावर आहे.


2019 पासून आतापर्यंत रोहित शर्मा (Rohit Sharma) याने त्याच्या नेतृत्वातील एकही सामना गमवलेला नाही. हा त्याचा लागोपाठ 12 वा विजय आहे. 2018 मध्ये देखील त्याने लागोपाठ 12 सामने जिंकले होते. विराट कोहलीने 2017 मध्ये ही कामगिरी केली होती. आता आगामी श्रीलंका सीरीज 24 फेब्रुवारीपासून सुरु होत आहे. त्यामुळे रोहित शर्माकडे आणखी पुढे जाण्याची संधी आहे.


भारताचा हा नोव्हेंबर 2021 ते फेब्रुवारी 2022 पर्यंतचा लागोपाठ नववा विजय आहे.