IND vs WI: रोहित शर्मा कॅप्टन्सी सोडणार? पुढचा कॅप्टन कोण? स्पष्ट संकेत मिळाले!
Indian Cricket Team: टॉसवेळी रोहित शर्मा (Rohit Sharma) मैदानात उरलाच नाही. त्यामुळे सर्वांनी आश्चर्य व्यक्त केलं. त्यामुळे आता रोहित शर्माची कॅप्टन्सी (Indian Captain) जाणार की काय? असा सवाल आता विचारला जात आहे.
West Indies vs India, 2nd ODI: आगामी आशिया कप आणि वर्ल्ड कपच्या पार्श्वभूमीवर (World Cup 2023) टीम इंडियामध्ये मोठे बदल केले जात आहेत. सध्या भारत आणि वेस्ट इंडिज ( IND vs WI ) यांच्यात खेळल्या गेलेल्या पहिल्या वनडे सामन्यात अनेक बदल पहायला मिळाले. त्यानंतर आता दुसऱ्या सामन्यात वेस्ट इंडिज संघाने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र, टॉसवेळी रोहित शर्मा (Rohit Sharma) मैदानात उरलाच नाही. त्यामुळे सर्वांनी आश्चर्य व्यक्त केलं. त्यामुळे आता रोहित शर्माची कॅप्टन्सी (Indian Captain) जाणार की काय? असा सवाल आता विचारला जात आहे.
वेस्ट इंडीजविरुद्धच्या दुसऱ्या वनडे सामन्यात हार्दिक पंड्या भारतीय संघाचे (Indian Cricket Team) नेतृत्व करत आहे. रोहित शर्मा खेळत नसल्यामुळे संघाचे कर्णधारपद हार्दिककडे सोपवले गेले. रोहित शर्मा यांच्यासह विराट कोहली यालाही दुसऱ्या वनडेत विश्रांती दिली गेली आहे. त्यामुळे आता आगामी वर्ल्ड कपमध्ये रोहित शर्मा जखमी झाला तर त्याच्याजागी हार्दिक पांड्याकडे कॅप्टन्सी जाणार अशी शक्यता वर्तविली जात आहे.
गेल्या काही सामन्यात संजू सॅमसनला संधी दिली जात नव्हती. त्यामुळे सोशल मीडियावर मोठा राडा झाल्याचं पहायला मिळालं होतं. अनेकांनी रोहित शर्माला ट्रोल केलं होतं. अशातच आता विराट आणि रोहित या दोन सिनियर प्लेयर्सने संघातून काढता पाय घेत संजू सॅमसन आणि अक्षर पटेल यांना संघात स्थान दिलंय.
दुसऱ्या वनडे सामन्यासाठी रोहित शर्मा आणि विराट कोहली यांना विश्रांती देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कारण गेले काही दिवस बरेच क्रिकेट ते खेळले आहेत. त्याचबरोबर युवा खेळाडूंना संघात त्यामुळे संधी मिळू शकते, असं टॉसवेळी हार्दिक पांड्याने म्हटलं आहे.
India Squad Playing XI
शुभमन गिल, इशान किशन (WK), संजू सॅमसन, हार्दिक पांड्या (C), सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, उमरान मलिक, मुकेश कुमार.
West Indies Squad Playing XI
ब्रँडन किंग, काइल मेयर्स, अॅलिक अथानाझे, शाई होप (C), शिमरॉन हेटमायर, केसी कार्टी, रोमॅरियो शेफर्ड, यानिक कॅरिया, अल्झारी जोसेफ, गुडाकेश मोटी, जयडेन सील्स.