धडाकेबाज खेळाडूंसह मैदानात उतरणार विंडीजची तगडी टीम, टीम इंडियासमोर मोठं आव्हान
टीम इंडिया विरुद्ध टी 20 सीरिजसाठी वेस्ट इंडिजच्या टीमची घोषणा, पाहा कोणाला मिळाली संधी?
मुंबई : दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी आणि वन डे सीरिजमध्ये मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला. आता टीम इंडियाचा पुढचा दौरा वेस्ट इंडिज आहे. विंडिज विरुद्ध टीम इंडिया टी 20 सीरिज होणार आहे. त्यासाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली होती. आता वेस्ट इंडिजच्या टीमची घोषणा करण्यात आली आहे.
वेस्ट इंडिजने भारताविरुद्धच्या आगामी तीन सामन्यांच्या T20I मालिकेसाठी 16 जणांचा संघ जाहीर केला. अपेक्षेप्रमाणे, किरोन पोलार्डकडे या संघांचं नेतृत्व देण्यात आलं आहे. तर निकोलस पूरन उपकर्णधारपद सांभाळणणार आहे. मुंबई संघाकडून आयपीएलमध्ये खेळलेल्या दोन खेळाडूंना आता टीम इंडिया विरुद्ध वन डे आणि टी 20 सीरिजसाठी संघात संधी देण्यात आली आहे.
वेस्ट इंडिज टीम - किरॉन पोलार्ड (कर्णधार), निकोलस पूरन (उपकर्णधार), फॅबियन ऍलन, डॅरेन ब्राव्हो, रोस्टन चेस, शेल्डन कॉट्रेल, डॉमिनिक ड्रेक्स, जेसन होल्डर, शाई होप, अकील होसेन, ब्रँडन किंग, रोव्हमन पॉवेल, ओडियन स्मिथ, रोमॅरियो शेफर्ड, काइल मेयर्स , हेडन वॉल्श जूनियर
वनडे सीरिजसाठी टीम इंडिया : रोहित शर्मा (कॅप्टन), केएल राहुल (उपकर्णधार), ऋतुराज गायकवाड, शिखर धवन, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, दीपक हुडा, रिषभ पंत (विकेटकीपर), दीपक चाहर, शार्दुल ठाकूर, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिष्णोई, मोहम्मद सिराज, प्रसीध कृष्णा आणि आवेश खान
टी 20 सीरिजसाठी टीम इंडिया : रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), इशान किशन, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत (विकेटकीपर), व्यंकटेश अय्यर, दीपक चहर, शार्दुल ठाकूर, रवी बिश्नोई, अक्षर पटेल, युझवेंद्र चहल, वॉशिंग्टन सुंदर, मोहम्मद सिराज, भुवनेश्वर, आवेश खान आणि हर्षल पटेल.
विडिंज विरुद्धच्या वनडे आणि टी 20 मालिकेचं वेळापत्रक
पहिली वनडे - 6 फेब्रुवारी
दुसरी वनडे - 9 फेब्रुवारी
तिसरी वनडे -12 फेब्रुवारी
तिन्ही सामने अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये खेळवण्यात येणार आहेत.
पहिली टी 20 - 15 फेब्रुवारी
दुसरी टी 20 - 18 फेब्रुवारी
तिसरी टी 20 - 21 फेब्रुवारी
टी 20 मालिकेतील तिन्ही सामने कोलकातातील इडन गार्डनमध्ये पार पडतील.