मुंबई : लॉडरहिलमध्ये झालेल्या मालिकेतील पाचव्या आणि शेवटच्या T20 सामन्यात टीम इंडियाने वेस्ट इंडिजचा 88 रन्सने पराभव केला. यासह भारताने पाच सामन्यांची मालिका 4-1 अशी खिशात घातली. प्रथम फलंदाजी करताना भारतीय टीमने 7 विकेट्स गमावत 188 रन्स केले. प्रत्युत्तरात वेस्ट इंडिजचा संपूर्ण टीम 15.4 ओव्हर्समध्ये 100 रन्सवर गारद झाला. भारतीय टीमच्या विजयाचा हिरो ठरला श्रेयस अय्यर ठरला.


हार्दिक पंड्या कर्णधार होता


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नियमित कर्णधार रोहितच्या जागी टीमची धुरा हार्दिक पंड्याने सांभाळली होती. त्याने टॉस जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. त्यानंतर श्रेयस अय्यरने सलामीवीर इशान किशन याच्यासोबत पहिल्या विकेटसाठी 38 धावा आणि दीपक हुडासोबत दुसऱ्या विकेटसाठी 76 धावांची भागीदारी केली. 


दीपक हुडाने 25 चेंडूंच्या खेळीत तीन फोर आणि दोन सिक्स ठोकले. श्रेयस अय्यरने 40 चेंडूंच्या खेळीत आठ फोर आणि दोन सिक्स ठोकले.


संजू-कार्तिकने ठरले फेल


टीम इंडिया एका वेळी तीन विकेट्सच्या मोबदल्यात 135 रन्स अशा चांगल्या स्थितीत होती. पण अखेरच्या ओव्हरममध्ये टीमला अपेक्षेप्रमाणे वेगवान रन्स करता आले नाहीत. संजू सॅमसन पुन्हा एकदा फेल गेला. त्याने केवळ 15 रन्स केले. तर दिनेश कार्तिक सलग दुसऱ्या सामन्यात फिनिशरची भूमिका बजावू शकला नाही. 


शेवटच्या ओव्हरमध्ये रनआऊट होण्यापूर्वी कर्णधार हार्दिकने 16 चेंडूत 2 फोर आणि 2 सिक्सच्या मदतीने 28 रन्स केले. वेस्ट इंडिजकडून ओडिअन स्मिथने चार ओव्हरमध्ये 33 रन्स देत तीन विकेट्स घेतले.


भारताने दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करताना विंडीजकडून केवळ शिमरॉन हेटमायर 35 बॉल्समध्ये 56 अशी चांगली फलंदाजी करू शकला. भारतीय फिरकीपटूंनी 9.2 ओव्हरमध्ये विंडीजला ऑलआऊट केलं. यामध्ये रवी विश्नोईने 2.4 ओव्हरमध्ये 16 रन्समध्ये 4, तर अक्षर पटेल आणि कुलदीप यादव यांनी प्रत्येकी तीन विकेट्स घेतले.