Ravi Bishnoi | नाद केला पण वाया नाय गेला! अखेर लेग स्पिनर रवी बिश्नोईची टीम इंडियामध्ये निवड
वेस्टइंडिज विरुद्धच्या (West Indies) वनडे आणि टी 20 मालिकेसाठी टीम इंडियाचा (Team India) संघ जाहीर करण्यात आला. या दोन्ही मालिकांसाठी रवी बिश्नोई (Ravi Bishnoi) या नव्या दमाच्या युवा स्पिन गोलंदाजाला संधी देण्यात आली.
मुंबई : वेस्टइंडिज विरुद्धच्या (West Indies) वनडे आणि टी 20 मालिकेसाठी बुधवारी 26 जानेवारी 2022 ला टीम इंडियाची (Team India) घोषणा करण्यात आली. या वनडे आणि टी 20 टीमसाठी रवी बिश्नोई (Ravi Bishnoi) या नव्या दमाच्या युवा स्पिन गोलंदाजाला संधी देण्यात आली. रवीने आयपीएलच्या गेल्या 2 मोसमात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. रवीला त्याच्या मेहनतीचं फल मिळालं. (ind vs wi upcoming odi and t 20 series ravi bishnoi 1st indian cricketer to get a chance senior team from indian under 19 world cup 2020 batch)
रवीने क्रिकेटसाठी शिक्षण सोडलं. मुख्याध्यापक असलेल्या वडिलांचा विरोध झुगारुन त्याने क्रिकेट खेळणं सुरुच ठेवलं. अनेकदा त्याला सीनिअर टीममध्ये खेळण्याची संधी मिळाली नाही. मात्र त्याने धीर सोडला नाही. अखेर त्याची सीनिअर टीममध्ये निवड झालीच.
रवीला 2018 मध्ये क्रिकेटसाठी वडिलांच्या विरोधात जावं लागलं होतं. रवी तेव्हा आयपीएलमधील राजस्थान टीमसाठी नेट बॉलर म्हणून समावेश करण्यात आलं होतं. त्याच वेळेस रवीच्या बोर्डाच्या परीक्षा सुरु होणार होत्या.
रवीने परत येत परीक्षा द्यायला हवी, अशी त्याच्या वडिलांची इच्छा होती. पण कसंल काय. रवी तिथेच राजस्थानच्या कॅम्पमध्येच थांबला. हाच निर्णय रवीच्या क्रिकेट कारकिर्दीतील टर्निंग पॉइंट ठरला.रवीने अजूनही बोर्डाची परीक्षा दिलेली नाही. यावरुन हेच सिद्ध होतं की जर तुमच्यात क्षमता असेल, तर तुम्हाला शिक्षणाचा अडसर येत नाही.
अंडर 19 वर्ल्ड कपआधी रवीच्या पदरी अनेकदा नकार पडले. रवीला अंडर 16 च्या ट्राल्समध्ये संधी मिळाली नाही. त्यानंतर अंडर 19 वर्ल्ड कपसाठीच्या ट्राएल्ससाठीही रवीला संधी मिळाली नाही. मात्र रवी निराश झाला नाही.
राजस्थानसाठी बॉलिंग करताना रवीवर कोचिंग स्टाफमधील शामिल दिशांत याग्निक यांच्या संपर्कात आला. रवीने शामिलला प्रभावित केलं.
अंडर 19 वर्ल्ड कपमधील कामगिरी
रवीची अखेर अंडर 19 वर्ल्ड कपसाठी निवड झाली. त्याने या स्पर्धेत 17 विकेट्स घेतल्या. सोबतच जपान आणि न्यूझीलंड विरुद्धच्या सामन्यात त्याने धमाकेदार कामगिरी केली. त्याला या कामगिरीसाठी 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्काराने गौरवण्यात आलं. इथूनच रवीसाठी आयपीएलचे दरवाजे खुले झाले. रवीला पंजाबने आपल्या ताफ्यात घेतलं.
टीम इंडियाचं भविष्य
रवीकडे टीम इंडियाच्या फिरकी गोलंदाजीचं भविष्य म्हणून पाहिलं जात आहे. रवीची विडिंज विरुद्धच्या वनडे आणि टी 20 सीरिजसाठी निवड झाली आहे. त्यामुळे रवीला आता अनेक दिग्गजांचं मार्गदर्शन मिळेल.