हरारे : तिसऱ्या आणि शेवटच्या वनडे सामन्यात टीम इंडियाने (Team india) झिम्बाब्वेविरुद्ध टॉस जिंकून प्रथम बॅटींग करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे झिम्बाब्वेला प्रथम बॉलिंग करावी लागणार आहे. या सामन्यात टीम इंडियाच्या (Team india) प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल करण्यात आले आहेत. मात्र युवा खेळाडूंना पुन्हा संधी मिळाली नाहीए. त्यामुळे डेब्यूच्या प्रतिक्षेत असलेल्या खेळाडूंची निराशा झाली आहे.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तिसऱ्या वनडे सामन्यासाठी टीम इंडियाच्या (Team india) प्लेइंग इलेव्हनमध्ये दोन बदल करण्यात आले आहेत. दीपक चहर आणि आवेश खानचा प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश करण्यात आला आहे. तर प्रसिद्ध कृष्णा आणि मोहम्मद सिराज यांना वगळण्यात आले आहे. 


विशेष म्हणजे टीम इंडियाने (Team india) झिम्बाब्वे विरूद्धची मालिका 2-0 ने आधीच जिंकली आहे.त्यात त्यांना तिसऱ्या वनडे सामन्यात युवा खेळाडूंना संधी देता आली असती. काही सिनियर खेळाडूंना विश्रांती देऊन राहूल त्रिपाठी (Rahul Tripathi) आणि शाहबाज अहमदला (Shahbaz ahmad) डेब्यूची संधी देता आली असती मात्र तसे झाले नाही. त्यामुळे या युवा खेळाडूंचा डेब्यू रखडला आहे.  


राहुल त्रिपाठीने (Rahul Tripathi) IPL 2022 मध्ये धमाकेदार कामगिरी केली आहे. याचं त्याच्या खेळीच्या बळावर त्याची संघात निवड झाली आहे. मात्र प्लेईंग इलेव्हन पासून अजूनही तो दुरचं आहे. त्यात बॉलर शाहबाज अहमदला (Shahbaz ahmad) देखील त्याच्या आयपीएल 2022 मधील कामगिरीवरून निवड करण्यात आली आहे.मात्र तोही प्लेईंग इलेव्हन पासून दुर आहे. तिसऱ्या वनडे सामन्यात या दोन्ही खेळाडूंचा डेब्यू होणार असल्याची चर्चा होती. मात्र या चर्चा निष्फळ ठरल्या आहेत. नवख्या खेळाडूंना संधी न देता कारण दीपक चहर आणि आवेश खानचा प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश करण्यात आला आहे.


दरम्यान झिम्बाब्वे विरूद्धची मालिका भारताने 2-0 ने खिशात घातली आहे. तिसरा वनडे सामना जिंकून झिम्बाब्वे क्लिन स्वीप करण्याचा टीम इंडियाचा मानस आहे.  


टीम इंडिया संघ : शिखर धवन, केएल राहुल (क), शुभमन गिल, इशान किशन, दीपक हुडा, संजू सॅमसन (विकेटकीपर), अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, दीपक चहर, कुलदीप यादव, आवेश खान


झिम्बाब्वे संघ :  ताकुडझ्वानाशे काएटानो, इनोसेंट कैया, टोनी मुन्योंगा, रेगिस चाकाब्वा (w/c), अलेक्झांडर रझा, शॉन विल्यम्स, रायन बर्ले, ल्यूक जोंगवे, ब्रॅड इव्हान्स, व्हिक्टर न्युची, रिचर्ड नगारवा