India tour of Zimbabwe : तब्बल 17 वर्षांनी टी-20 वर्ल्ड कप जिंकण्यात भारताला यश आलं. या ऐतिहासिक कामगिरीनंतर आता बीसीसीआयने (BCCI) आगामी कार्यक्रमाची आखणी केली आहे. टीम इंडियाची युवा ब्रिगेड झिम्बाब्वेविरूद्ध टी-20 मालिका खेळणार आहे. पाच सामन्यांच्या मालिकेसाठी टीम इंडिया झिम्बॉब्वे दौऱ्यावर रवाना झाली आहे. मालिकेला 6 जुलै तारखेपासून सुरुवात होत आहे. अशातच बीसीसीआयने आपल्या संघात मोठा बदल केला आहे. बीसीसीआयने तीन खेळाडूंची नावं जाहीर केली आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

टीम इंडियाच्या निवड समितीने झिम्बाब्वेविरुद्धच्या पहिल्या दोन टी-ट्वेंटी सामन्यांसाठी संजू सॅमसन, शिवम दुबे आणि यशस्वी जैस्वाल यांच्या जागी साई सुधारसन, जितेश शर्मा आणि हर्षित राणा यांची निवड केली आहे. वर्ल्ड कप घेऊन भारतात येणारी टीम उशिरा येणार असल्याने बीसीसीआयने तडकाफडकी निर्णय घेतल्याची माहिती मिळत आहे. 


दरम्यान, झिम्बाब्वेविरुद्ध टीम इंडिया पाच टी-ट्वेंटी सामने खेळणार आहे. पहिला सामना 6 जुलै रोजी हरारे इथे होईल. तर लगेच 7 जुलै रोजी दुसरा सामना खेळवला जाणार आहे. तिसरा सामना 10 जुलै रोजी तर चौथा सामना 13 जुलै रोजी असेल. पाचवा सामना 14 जुलै रोजी होईल. त्यामुळे एकाच आठवड्यात संपूर्ण टी-ट्वेंटी मालिका संपणार आहे.



पहिल्या दोन टी-20 साठी टीम इंडिया - शुभमन गिल (C), ऋतुराज गायकवाड, अभिषेक शर्मा, रिंकू सिंग, ध्रुव जुरेल (WK), रियान पराग, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, आवेश खान, खलील अहमद, मुकेश कुमार, तुषार देशपांडे, साई सुदर्शन, जितेश शर्मा (WK), हर्षित राणा.


टी-ट्वेंटी मालिकेसाठी झिम्बाब्वेचा संघ - सिकंदर रजा (C), अकरम फराज, बॅनेट ब्रायन, कॅम्पबेल जोनाथन, तेंदई चतारा, ल्यूक जोंगवे, इनोसेंट काइया, क्लाइव मडांडे, वेस्ली मधेविरे, तदिवनाशे मारुमानी, वेलिंग्टन मसाकाद्जा, ब्रँडन मावुता, ब्लेसिंग मुजरबानी, डायोन मायर्स, अंतुम नकवी, रिचर्ड नगारवा, मिल्टन शुम्बा.