मुंबई : ICC T20 विश्वचषक संपल्यानंतर भारतीय क्रिकेट संघाला घरच्या मैदानावर न्यूझीलंड संघासोबत खेळायचे आहे. यानंतर टीम इंडिया (Tram India) दक्षिण आफ्रिकेच्या (South Africa Tour) दौऱ्यावर जाणार आहे. भारत अ संघही या दौऱ्यावर वरिष्ठ खेळाडूंसह जाणार आहे. मंगळवारी न्यूझीलंडविरुद्धच्या टी-20 मालिकेसोबतच दक्षिण आफ्रिकेचा दौरा करणाऱ्या भारत अ संघाचीही घोषणा करण्यात आली. (India A squad for south africa tour)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारताच्या मुख्य संघापूर्वी भारत अ संघ दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर जाणार आहे. (India A vs South Africa) या संघाला येथे तीन ते चार दिवस खेळायचे आहे. भारत अ संघ 23 नोव्हेंबरला पहिला सामना खेळणार आहे. तर शेवटचा सामना 6 डिसेंबरला होणार आहे. भारताचा वरिष्ठ संघ 17 डिसेंबर ते 26 जानेवारी दरम्यान दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर जाणार आहे.


भारत अ संघाची कमान प्रियांक पांचालकडे सोपवण्यात आली आहे. या संघात आयपीएलमध्ये वेगाने चर्चेत आलेला जम्मू-काश्मीरचा वेगवान गोलंदाज उमरान मलिकला स्थान देण्यात आले आहे. त्याचबरोबर पृथ्वी शॉ, देवदत्त पडिक्कल आणि राहुल चहर यांनाही संधी देण्यात आली आहे. खराब फॉर्ममुळे पृथ्वी भारतीय संघाबाहेर होता. नवदीप सैनी आणि सरफराज खान यांनाही दक्षिण आफ्रिकेत जाण्याची संधी देण्यात आली आहे. संघाला 23 ते 26 नोव्हेंबर दरम्यान पहिला चार दिवसीय सामना खेळायचा आहे. दुसरा सामना 29 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर दरम्यान, तर शेवटचा सामना 6 ते 9 डिसेंबर दरम्यान होणार आहे.


भारत अ संघ पुढीलप्रमाणे


प्रियांक पांचाळ (कर्णधार), पृथ्वी शॉ, अभिमन्यू इसवरन, देवदत्त पडिक्कल, सरफराज खान, बाबा अपराजित, उपेंद्र यादव (Wk), के गौतम, राहुल चहर, सौरभ कुमार, नवदीप सैनी, उमरान मलिक, इशान पोरेल आणि अर्झान नागासवाला.


न्यूझीलंडविरुद्धच्या T20 मालिकेसाठी भारतीय संघ पुढीलप्रमाणे


रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), ऋतुराज गायकवाड, इशान किशन (wk), ऋषभ पंत (Wk) सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, व्यंकटेश अय्यर, आर अश्विन, युझवेंद्र चहल, आवेश खान, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, दीपक चहर, मोहम्मद सिराज आणि हर्षल पटेल.