India vs Australia : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाचवा टी20 सामना बंगळुरू येथे खेळला गेला. रोमांचक अशा सामन्यात टीम इंडियाने (IND vs AUS) ऑस्ट्रेलियाचा 6 धावांनी पराभव केला असून मालिका 4-1 ने खिशात घातली आहे. टीम इंडियाने कांगारुंसमोर 161 धावांचं आव्हान ठेवलं होतं. त्याला प्रत्युत्तर देताना ऑस्ट्रेलियाला 154 धावाच करता आल्या. टीम इंडिया अडचणीत असताना उपकर्णधार श्रेयस अय्यर (Shreyas iyer) याने अर्धशतकी खेळी केली. तर गोलंदाजीमध्ये मुकेश कुमार (Mukesh Kumar) आणि अर्शदीप सिंग (Arshdeep Singh) यांनी भेदक गोलंदाजी केली. त्यामुळे आता या मालिकेत टीम इंडियाचा शेवट देखील गोड झाला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

टीम इंडियाने दिलेल्या 161 धावांचं आव्हान पार करताना ऑस्ट्रेलियाने दमदार सुरूवात केली. ट्रेविस हेड अन् बेन मॅकडरमॉट यांनी आक्रमक सुरूवात करून दिली. मात्र, रवी बिश्नोईला ऑस्ट्रेलियाला दणका दिला. त्यानंतर अर्शदीपने मॅकडरमॉटला घरचा रस्ता दाखवला. त्यानंतर टीम डेव्हिड आणि मॅथ्यू शॉट बाद धाले. मुकेश कुमारने एकाच ओव्हरमध्ये दोन धक्के दिले अन् सामना रोमांचक स्थिती आणला. ऑस्ट्रेलियाला अखेरच्या तीन ओव्हरमध्ये 32 धावांची गरज होती. पण मैदानात होता कॅप्टन मॅथ्यू वेड... वेडने मैदानात चिवड खेळी केली. ऑस्ट्रेलियाला अखेरच्या ओव्हरमध्ये 10 धावांची गरज होती. अर्शदीप सिंगने वेडला बाद करून सामना फिरवला अन् सामना भारताने 6 धावांनी जिंकला आहे.


चौथ्या टी-ट्वेंटी सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना 8 विकेट्स गमावून 161 धावा केल्या. यशस्वी जयस्वाल आणि ऋतुराज गायकवाड या ओपनिंग जोडीने 33 धावांची भागीदारी केली. भारताकडून श्रेयस अय्यर याने सर्वाधिक 53 धावा केल्या.  कॅप्टन सूर्यकुमार यादव 5 धावा करुन माघारी परतला. रिंकू बाद झाल्यावर टीम इंडियाची 4 बाद 55 अशी स्थिती झाली. जितेश आणि श्रेयस या दोघांनी पाचव्या विकेटसाठी 42 धावांची पार्टनरशीप केली, तर अक्षर पटेल याने 31 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाकडून बेन ड्वार्शुइस याने 4 षटकात 30 धावा देत 2 विकेट्स घेतल्या. तर जेसन बेहरनडोर्फ याने 38 धावात 2 विकेट्स घेतल्या. 



टीम इंडिया : सूर्यकुमार यादव (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, ऋतुराज गायकवाड, श्रेयस अय्यर, रिंकू सिंग, जितेश शर्मा (विकेटकीपर), अक्षर पटेल, रवी बिश्नोई, आवेश खान, मुकेश कुमार आणि अर्शदीप सिंग.


ऑस्ट्रेलिया : मॅथ्यू वेड (कॅप्टन आणि विकेटकीपर), ट्रेव्हिस हेड, जोश फिलिप, बेन मॅकडरमॉट, एरॉन हार्डी, टिम डेव्हिड, मॅथ्यू शॉर्ट, बेन ड्वार्शुइस, नॅथन एलिस, जेसन बेहरेनडॉर्फ आणि तन्वीर संघा.