India vs Sri Lanka 2nd t20 : भारत आणि श्रीलंका यांच्यात झालेल्या दुसऱ्या टी-ट्वेंटी सामन्यात टीम इंडियाने श्रीलंकेवर 7 विकेट्सने विजय मिळवला आहे. दुसऱ्या टी 20 सामन्यात पावसाने खोडा घातला होता. त्यामुळे भारताला डकवर्थ लुईस नियमांच्या आधारावर केवळ 8 ओव्हर फलंदाजी करण्याची संधी मिळाली. 8 ओव्हरमध्ये 78 धावांचं आव्हान टीम इंडियाने आरामात पूर्ण केलं. सूर्यकुमार यादव आणि हार्दिक पांड्याच्या आक्रमक फलंदाजीच्या जोरावर टीम इंडियाने खेळ खल्लास केला आणि मालिका नावावर केला. भारताकडून रवी बिश्नोईने सर्वाधिक 3 विकेट्स तर फलंदाजीमध्ये यशस्वी जयस्वालने सर्वाधिक 30 धावा केल्या.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

श्रीलंकेने 162 धावांचं आव्हान टीम इंडियासमोर ठेवलं होतं. टीम इंडियाने पाठलाग सुरू केला अन् पावसाने हजेरी लावली. भारताने 0.3 ओव्हरमध्ये 6 धावा केल्यावर पावसाची रिपझिप सुरू झाली. त्यानंतर ओव्हरमध्ये कटिंग करण्यात आली. त्यामुळे टीम इंडियाला 8 ओव्हरमध्ये 78 धावांचं टार्गेट देण्यात आलं होतं. संजू सॅमसन पहिल्याच बॉलवर बाद झाल्याने सूर्याला मैदानात यावं लागलं. सूर्याने 12 बॉलमध्ये 26 धावांची आक्रमक खेळी केली अन् टीम इंडियाला विजयाच्या उंभरठ्यावर पोहोचवलं. त्यानंतर हार्दिक पांड्याने काम सोपं केलं. हार्दिकने 9 बॉलमध्ये 22 धावा केल्या अन् विनिंग फोर मारला.


श्रीलंकेने 20 ओव्हरमध्ये केल्या 161 धावा केल्या होत्या. टीम इंडियासमोर 162 धावांचं आव्हान होतं. श्रीलंकेकडून कुसल परेरा याने सर्वाधिक 53 धावांची खेळी केली. एकेवेळी 130 वर 2 गडी बाद अशी परिस्थिती असताना रवि बिश्नोईने दोन महत्त्वाच्या विकेट्स काढल्या अन् टीम इंडियाला गेममध्ये परत आणलं. टीम इंडियासाठी बिश्नोईने सर्वाधिक 3 विकेट्स घेल्या. तर अर्शदीप सिंग, अक्षर पटेल आणि हार्दिक पांड्या यांनी प्रत्येकी 2-2 विकेट्स नावावर केल्या. 



टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन : सूर्यकुमार यादव (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, संजू सॅमसन, ऋषभ पंत (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, रियान पराग, रिंकू सिंग, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, रवी बिश्नोई आणि मोहम्मद सिराज.


श्रीलंका प्लेइंग ईलेव्हन : चरित असलंका (कॅप्टन), पाथुम निसांका, कुसल मेंडिस(विकेटकीपर), कुसल परेरा, कामिंदू मेंडिस, दासुन शनाका, वानिंदू हसरंगा, रमेश मेंडिस, महीश तीक्षना, मथीशा पाथिराना आणि असिथा फर्नांडो.